Kolhapur Airport News : कोल्हापूर विमानतळावरून पाटील, महाडिक अन् संभाजीराजेंमध्ये श्रेयवादाचे 'उडान'

Kolhapur Airport Latest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोल्हापूर विमानतळाच्या टर्मिनलचे उद्घाटन पार पडणार आहे
sambhajiraje chhatrapati dhananjay mahadik satej patil
sambhajiraje chhatrapati dhananjay mahadik satej patilsarkarnama

केंद्र शासनाने कोल्हापूरसह पुणे, जबलपूर, ग्वाल्हेर विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत उभारली आहे. या कामांचं उद्घाटन रविवारी ( 10 मार्च ) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. आज मोठ्या उत्साहात या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन पार पडणार आहे. मात्र, याच विमानतळावरून आता कोल्हापूर जिल्ह्यातील तीन महत्वाच्या नेत्यांत जुंपली आहे.

sambhajiraje chhatrapati dhananjay mahadik satej patil
Sharad Pawar On Sangram Thopte : संग्राम थोपटेंना जाहीर सभेतून पवारांचा मोठा शब्द; म्हणाले...

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक ( Dhananjay Mahadik ), माजी पालकमंत्री व आमदार सतेज पाटील ( Satej Patil ) आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती ( Sambhajiraje Chhatrapati ) यांच्यात सोशल मीडिया वॉर आणि श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. शनिवारी ( 9 मार्च ) महाडिक गटाने इमारतीचे व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर माजी खासदार संभाजीराजें आणि आमदार सतेज पाटील यांनी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करत, इमारत पूर्ण होण्यासाठी आपण पाठपुरावा केल्याचे दाखले दिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार सतेज पाटील ( Satej Patil ) गटाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यासह केंद्रीय हवाई मंत्र्याना लिहलेली पत्रे आणि मंजूर केलेला निधी याचे दाखले देण्यात आले आहेत. एकप्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदार पाटील यांनी महाडिक यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहेत.

sambhajiraje chhatrapati dhananjay mahadik satej patil
Sujay Vikhe News : 'मैं हू डॉन' गाण्यावर सुजय विखेंचा डान्स; पण 'मी डॉन नाही, तर..' असंही बोलून दाखवलं!

दुसरीकडे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती ( Sambhajiraje Chhatrapati ) यांच्याकडूनही पोस्ट व्हायरल केली आहे. फेसबुक पोस्ट करत संभाजीराजे छत्रपती म्हणाले, "मी खासदार असताना कोल्हापूर विमानतळ विकासासाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा केला होता. त्यावेळेस नवीन टर्मिनल इमारत उभारणीस मंजूरी मिळाली होती. या टर्मिनल इमारतीची रचना नेहमीप्रमाणे आधुनिक शैलीत करण्यात आलेली होती. मात्र, मी स्वतः यामध्ये लक्ष घालून व तत्कालीन हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा करून टर्मिनल इमारतीची किमान बाह्य रचना तरी ऐतिहासिक धाटणीची असावी अशी मांडणी करून त्याचे आरेखन तयार करून घेतले होते. माझ्या दिल्ली येथील तत्कालीन शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत या नवीन टर्मिनलचे ऐतिहासिक डिझाईन फायनल करण्यात आले होते व ते मंत्री महोदयांकडे सादर करून मंजूरी घेतली होती."

"तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील मी पाठपुरावा करून या इमारतीसाठी राज्य शासनाकडून निधी मंजूर करून आणला होता. आधुनिकतेची जाण असणारे कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज यांनी कोल्हापूर विमानतळाचा पाया रचला होता. कोल्हापूरचे ऐतिहासिक महत्त्व, संस्कृती ही हवाई मार्गे कोल्हापूरात येणाऱ्या प्रवाशांना समजावी, त्याबाबत उत्सुकता व जिज्ञासा निर्माण व्हावी, या उद्देशाने मी हा प्रस्ताव मांडला होता व त्याच्या अंमबजावणीसाठी प्रयत्न केले होते. आज ही इमारत साकारलेली पाहून एक आत्मिक समाधान लाभते. या वास्तूचे उद्घाटन होऊन लोकसेवेत सज्ज होत आहे, याचा आनंद आहे," असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं.

दरम्यान, सतेज पाटील आणि संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

sambhajiraje chhatrapati dhananjay mahadik satej patil
Eknath Shinde : रामदासभाई बोलले ती वस्तुस्थिती; मुख्यमंत्री शिंदेंनीही ओढली कदमांची री

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com