Supriya Sule News : सुनील शेळकेंचा 'हा' आरोप अन् सुप्रिया सुळे घेणार अमित शाहांकडे धाव

Supriya Sule Pune News : "वारजे येथील मल्टीस्पेशलिटी रूग्णालयातील 84 टक्के बेड व्यावसायासाठी आहेत. तर...", असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं.
sunil shelke amit shah supriya sule
sunil shelke amit shah supriya sulesarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट एकामेकांसमोर उभे ठाकल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमुळे सोशल मीडिया वॉर पाहायला मिळत आहे. यातून दोन्ही बाजूच्या नेत्यांना ट्रोल करण्यात येत आहे. हाच मुद्दा घेऊन आमदार सुनील शेळके ( Sunil Shelke ) यांनी गंभीर आरोप केला होता. त्याला खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी उत्तर दिलं आहे. त्या पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.

sunil shelke amit shah supriya sule
Supriya Sule On Ajit Pawar : आधी बारामती अन् आता पुण्यातही अजितदादांशी 'अबोला' का? सुप्रिया सुळे म्हणाल्या...

"अजित पवार ( Ajit Pawar ) मुख्यमंत्री होऊ नये म्हणून त्यांना ट्रोल करण्याकरिता काहींनी करोडो रुपये खर्चून शेकडो माणसे कामाला लावली आहेत," असा आरोप सुनील शेळकेंनी ( Sunil Shelke ) केला होता.

यावर सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) म्हणाल्या, "आपल्यासारख्या गरीब देशामध्ये ट्रोलिंगसाठी जर हजारो कोटी रुपये मिळणार असतील, तर त्याची सीबीआय चौकशी होणे आवश्यक आहे. ज्यातून ट्रोलिंगसाठी हजारो कोटी कोण वापरत आहेत, हे समोर येईल. याप्रकरणी मी अमित शाहांना पत्र लिहिणार आहे. महायुतीतील आमदाराला जर ट्रोलिंगसाठी कोट्यावधींच्या पैशांचा वापर होत आहे, असं वाटत असेल, तर 'महाराष्ट्र खतरे मे हैं'."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"आमचं सरकार आल्यानंतर रूग्णालय मोफत करणार"

"उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलेल्या वारजे येथील मल्टीस्पेशलिटी रूग्णालयातील 84 टक्के बेड व्यावसायासाठी आहेत. तर, अशा व्यावसायिक रूग्णालयाला महापालिकेची जागा कशासाठी द्यायाची, हा एक प्रश्न निर्माण होत आहे. पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण रूग्णालयाप्रमाणे हे रूग्णालय सुद्धा 100 टक्के मोफत करणं आवश्यक आहे. आमचं सरकार आल्यानंतर हे रूग्णालय गोरगरिबांसाठी मोफत करण्याचा प्रयत्न करणार," असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

sunil shelke amit shah supriya sule
Sunil Shelke News : "मला खासदार अन् माझ्या भावाला मुख्यमंत्री व्हायचं नाही, तुमचं...", शेळकेंचा सुळेंना टोला

"महापालिकेनं व्हाईट पेपर काढावा"

"अशा व्यावसायिक प्रकल्पासाठी महापालिकेनं मोक्याच्या ठिकाणी जागा देणं ही चिंतेची बाब आहे. या सगळ्याची चौकशी होणं आवश्यक आहे. याबाबतच व्हाईट पेपर महापालिकेनं काढावा," अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.

sunil shelke amit shah supriya sule
VSI Meeting : अजितदादा, वळसे पाटलांनी शरद पवारांसोबत एकत्र येणे टाळले...

"निवडणूक आयुक्तांनी राजीनामा देणं चिंतेची बाब"

"सद्य स्थितीला निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी राजीनामा देणं ही सर्वाधिक गंभीर बाब आहे. देशासाठी महत्वपूर्ण असलेल्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यातच दोन-तीन आधीच अशाप्रकारचे निवडणूक आयोगामधील व्यक्तीनं राजीनामा देणं ही चिंतेची बाब आहे. या घटनेतून पुन्हा एकदा देशात आणि दिल्लीत दडपशाही सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे," असं अप्रत्यक्षपणे टीकास्र सुप्रिया सुळेंनी भाजपवर केलं आहे.

sunil shelke amit shah supriya sule
Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात ठरणार यवतमाळ-वाशीमचा उमेदवार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com