Anant Geete, Sunil Tatkare Sarkarnama
कोकण

Raigad Loksabha 2024 : रायगड लोकसभेवर भाजपचा दावा पण शिंदे गटाचा आमदार म्हणतोय; यंदाही तटकरेच खासदार...!

सरकारनामा ब्यूरो

Raigad Political News : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच रायगडमध्येही भाजप व राष्ट्रवादीतही उमेदवारीवरून संघर्ष होण्याची चिन्हे दिसून येत आहे. मात्र, याचवेळी शिंदे गटाच्या आमदाराने मात्र, विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. तसेच माजी खासदार अनंत गीते यांच्यावरही निशाणा साधला आहे. ते सहावेळेला खासदार असतानाही निधी आणू शकले नाहीत असा हल्लाबोल गितेंवर केला आहे. टीकेचे लक्ष केल आहे. त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात सुरू असलेले दावे- प्रतिदावे एकमेकांच्या विरोधातील विधाने यावरून महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचा आता स्पष्ट झाले आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून शिवसेना राष्ट्रवादी महायुतीमध्ये दावे प्रतिदावे सुरू आहेत. भाजपानेही धैर्यशील पाटील यांच्या उमेदवारीची जाहीर मागणी केली आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना महायुतीकडून उमेदवारी मिळेल व तेच पुन्हा खासदार असतील असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

आमची महायुती असून महायुतीमधून भाजपाचे(BJP) धैर्यशील पाटील यांचे नाव पुढे येत आहे मग येथील उमेदवारीवरून महायुतीमध्ये वाद निर्माण होईल का या प्रश्नावरती अलिबागच्या आमदार महेंद्र दळवी म्हणाले की असा कोणताही वाद आमच्या महायुतीमध्ये होणार नाही आणि खासदार सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत त्यामुळे पुन्हा त्यांनाच उमेदवारी मिळेल आणि या लोकसभा मतदारसंघासाठी सुनील तटकरे हेच योग्य उमेदवार आहेत आणि ते निवडून येतील असा विश्वास महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला.

सुनील तटकरे यांना फाईट देईल असा कोणताही उमेदवार समोर नाही असेही दळवी यांनी स्पष्ट केल. तटकरे व धैर्यशील पाटील या वादात अनंत गीते हे निवडून येतील का या प्रश्नावर दळवी म्हणाले की असे काहीही होणार नाही आम्ही महायुतीचे सगळे घटक पक्ष एकत्र आहोत. युतीचा एकच उमेदवार उभा राहणार असून त्यामुळे तटकरे हेच निवडून येतील. रायगड लोकसभेवर तटकरे यांचा अधिकार व हक्क आहे असेही वक्तव्य दळवी यांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपाचे गेले दोन दिवस झालेल्या सभांमधून धैर्यशील पाटील व तटकरे यांच्याबद्दल चर्चा समोर आल्या मात्र अशा चर्चा होऊ नयेत असं माझं वैयक्तिक मत आहे असेही आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी यावेळी स्पष्ट केलं. अशी चर्चा लोकसभेला होत असेल तर ही चर्चा विधानसभेला होईल आणि मग महायुतीमध्ये दरी निर्माण होईल त्यामुळे भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने यामध्ये लक्ष देऊन याला वेळीच निर्णय द्यायला हवा असं मत दळवी यांनी व्यक्त केले.

रायगड जिल्हा व या लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी तटकरे साहेबच विद्यमान खासदार पुन्हा लोकसभेचे खासदार असावेत अशी आमची इच्छा असून आणि ती विजयी होणार यामध्ये कोणतीही शंका नसल्या तरी आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे सध्या रायगड लोकसभेचे खासदार आहेत मात्र यावेळी त्यांनाही उमेदवारी न देता भाजपाला हे उमेदवारी मिळावी यासाठी भाजपाचे रायगडमधील नेते आग्रही आहेत. इतकच नाही तर सगळीच पद तटकरे यांच्या घरात कशाला हवीत असाही थेट सवाल भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी उपस्थित करत तटकरे यांना महायुतीमधूनच घरचा आहेर दिला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT