Chiplun Rane-Jadhav Clash Sarkarnama
कोकण

Chiplun Rane-Jadhav Clash : 'चिपळूणमधील राड्यानंतर जाधवांची पहिली रिअॅक्शन'; 'सभेला गर्दीच न जमल्याने...'

Chetan Zadpe

Konkan News : गुहागर येथील सभेसाठी नीलेश राणे यांचा ताफा मुंबईवरून गुहागरकडे जात होता. मात्र, त्यांचा गाड्यांचा ताफा चिपळूण येथे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर येताच मोठा गोंधळ निर्माण झाला. राणेंच्या ताफ्यामधील गाड्यांवर दगडफेक करण्यात आल्याने दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. त्यामुळे चिपळूण शहरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला आहे. यामुळे राणे आणि भास्कर जाधव यांच्यातला वाद पेटला आहे. यावर आता जाधवांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. (Latest Marathi News)

भास्कर जाधव म्हणाले, "भाजपचे सरचिटणीस नीलेश राणे हे माझ्या विधानसभा क्षेत्रात सभा घेण्यासाठी येणार, अशी जाहिरातबाजी झाली होती. यातून त्यांनी सोशल मीडियावरून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या ऑफिसबाहेर वेगवेगळे बॅनर लावले होते. त्याच्यावर गुन्ह्याला माफी नाही, हिशेब चुकता करणार, असं भडकावणारे बॅनर लावले गेले होते."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"ही सभा गुहागरला होती. नीलेश राणे मुंबईतून आले. वास्तविक त्यांनी दापोलीमार्गे गुहागरला जाणे अपेक्षित होते, पण ते जाणीवपूर्वक चिपळूणमध्ये आले. त्यांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात असलेली नाक्यावर लावलेली क्रेन माझ्या ऑफिससमोर लावण्याचा प्रयत्न केला. मी पोलिसांना विनंती केली, की ही क्रेन माझ्या ऑफिससमोर लावू नका, उगाच अनुचित प्रकार घडू नये," असे जाधव म्हणाले.

"मला अशी माहिती कळाली की, नीलेश राणेंच्या (Nilesh Rane) सभेला गुहागरमध्ये माणसंच जमली नाहीत. त्यामुळे पोलिस मला पुढे जाऊ देत नाहीत, असं कारण देऊन हे मागे फिरतील, म्हणून मी माझ्या लोकांना आवाहन केलं. आता सर्वांनी शांततेने घरी जा. आम्ही हा विषय संपवला. त्याचवेळी राणेंनी जाणीवपूर्वक त्याच ठिकाणी सत्कार केला. फटाक्यांची आतषबाजी केली. त्यांनी हातवारे करून आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न केला. मी लोकांना शांत केलं, पण पलीकडून त्यांच्या बाजूने दगडफेक सुरू झाली. त्यानंतर या बाजूनेही दगडफेक सुरू झाली," असे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT