Dapoli Nagar Panchayat Sarakrnama
कोकण

Dapoli Nagar Panchayat : औट घटकेपुरतं मिळालेल्या नगराध्यक्षपदाचा दापोलीत प्रचंड फटाके वाजवून सोहळा साजरा!

सरकारनांमा ब्यूरो

Ratnagiri Political News : दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी ठाकरे गटाच्या ममता मोरे विराजमान आहेत. मात्र या नगराध्यक्षा 15 दिवस रजेवर गेल्या आहेत त्यामुळे हा पदभार आता तात्पुरता उपनगराध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष असलेले खालीद रखांगे यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे.

मात्र केवळ पंधरा दिवसांसाठी असलेल्या औट घटकेच्या मिळालेल्या या नगराध्यक्ष पदाचा आनंदही मोठ्या दिमाखात फटाके वाजवून साजरा केल्याचे चित्र दापोली नगरपंचायत परिसरात पाहायला मिळालं.

इतकेच नाही तर राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष असलेला नगरसेवक हा तात्पुरता नगराध्यक्ष झाल्यावर त्यांचं अभिनंदन करण्यासाठी चक्क ठाकरे गटाचे पदाधिकारी सुद्धा खास दापोली नगरपंचायत कार्यालयात पोहोचले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे आज दापोली नगरपंचायतीत नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारण्याचा हा सोहळाच साजरा करण्यात आल्याचे अनोख चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे तो अजितदादांच्या(Ajit Pawar) राष्ट्रवादीचे नगरसेवक विद्यमान उपनगराध्यक्ष खालीद रखांगे व ठाकरे गटाचे पदाधिकारी यांचेही सबंध उत्तम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. महायुतीत या सगळ्या प्रकारची सध्या अवघ्या जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

दापोली नगरपंचायतीत आठवडाभरापूर्वीच विषय समित्यांमध्ये झालेल्या निवडीत ठाकरे गटाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दिलेला धक्का ही केवळ नेत्यांच्या आदेशाने केलेली औपचारिकता होती, याचीही चर्चा आता पुन्हा एकदा होऊ लागली आहे. विशेष समित्यांच्या बदलानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे(Shivsena) असलेल्या कृपा घाग यांना महिला बालकल्याण सभापती पद मिळाले होते.

तेव्हा सोशल मीडियावरती कोणताही आनंद किंवा अभिनंदन न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या एका महिला पदाधिकाऱ्याने मात्र खालीद रखांगे यांच्या औट घटकेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्याचा आनंद मात्र आपल्या स्टेटसवरती तत्परतेने अभिनंदन करत साजरा केल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) व आमदार योगेश कदम यांच्या फंडातून आलेल्या विकास कामासाठी निधी देण्यात आला होता. पण यासाठी लागणारे ठराव ठाकरे गटाच्या विद्यमान नगराध्यक्ष ममता मोरे हे ठराव सभागृहात मंजूर होऊ देत नव्हत्या. मात्र आता नगराध्यक्ष पदाचा तात्पुरता पदभार स्वीकारलेले राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष यासाठी लागणारे ठराव तत्परतेने सभागृह मंजूर करतात का हे पाहणं यानिमित्ताने महत्त्वाचे ठरणार आहे

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT