MLA Rajan Salvi
MLA Rajan Salvi Sarkarnama
कोकण

Rajan Salvi News : सामंतांविरोधात लढणार का? : राजन साळवी म्हणतात, ‘मरेपर्यंत मी राजापूरमधूनच निवडणूक लढवणार...’

सरकारनामा ब्यूरो

रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri) मतदारसंघातून उदय सामंत यांच्याविरोधात लढण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडून (Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे) वेगवेगळ्या नावांची चर्चा होत आहे. सुरुवातीला आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या नावाची चर्चा रंगली होती, त्यानंतर आता राजापूरचे (Rajapur) आमदार राजन साळवी (Rajan salvi) यांचे नाव पुढे येत आहे. त्यावर खुद्द राजन साळवी यांनी स्पष्टीकरण दिले असून ‘रत्नागिरीमधून लढण्यासाठी मला पक्षाकडून अजून तरी विचारणा करण्यात आलेली नाही’ असे त्यांनी म्हटले आहे. (I will fight from Rajapur till death : MLA Rajan Salvi)

आमदार साळवी म्हणाले की, रत्नागिरी विधानसभा निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने मला पक्षाकडून अद्याप कुठलीही विचारण्यात झालेली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मला राजापूरमधूनच उमेदवारी देतील, असा विश्वास आहे. तसेच, उमेदवारी देताना उद्धव ठाकरे हे माझ्या मताचा नक्की विचार करतील. मरेपर्यंत मी राजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या पाठीशी राहणार आहे, त्यामुळे मी मरेपर्यंत राजापूरमधून निवडणूक लढवणार आहे.

विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी यांनी केलेल्या विधानावर आमदार साळवी म्हणाले की, वीर सावरकर यांच्याबद्दल कोणी अपशब्द वापरला असेल तर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी आम्ही सर्व मंडळी आहोत. आम्ही स्वस्थ बसणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख यासंदर्भातील भूमिका जाहीर करतील. मात्र, वीर सावरकर यांचे देशासाठी मोठे योगदान आहे, विसरता येणार नाही.

कुठल्याही यंत्रणांचा वापर केला तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस डगमगणार नाही. भाजपच्या विरोधात जी मंडळी आहेत, त्यांना त्रास देण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, आमच्यासारखे बाळासाहेबांचे कडवे शिवसैनिक एक इंचसुद्धा मागे हटणार नाहीत, असे आव्हानही आमदार साळवी यांनी भाजपला दिले.

राहुल गांधी हे मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यावरही साळवी यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, एकमेकांच्या नेत्याला भेटणं, हे काही गैर नाही. राहुल गांधींच्या भेटीमुळे ऋणानुबंध आणखी वाढतील. काँग्रेसचे नेते म्हणून राहुल गांधी येणार असतील तर तो वेगळा भाग असेल. त्यांच्या विरोधात जर भाजप जाणार असेल तर शिवसेना गप्प बसणार नाही, असे आव्हान त्यांनी भाजपला दिले.

महाराष्ट्र आमचा, मुंबई आमची आहे, त्यामुळे कुठचीही निवडणूक असू दे, मुंबईकर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने उभे राहतील, असा ठाम विश्वासही आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT