Karnataka Election : भाजपच्या आणखी दोन आमदारांनी पक्ष सोडला : नाराजांची संख्या वाढली

माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्यासह पाच नेत्यांनी परवाच राजीनामा दिला होता. त्यानंतर काल पुन्हा दोन आमदारांनी पक्ष सोडला आहे.
MLA M. P. Kumaraswami-MLA Nehru Olekar
MLA M. P. Kumaraswami-MLA Nehru OlekarSarkarnama

बंगळूर : कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीसाठी (Election) भारतीय जनता पक्षाने (BJP) पहिल्या दोन यादीच्या माध्यमातून २१२ जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. यात विद्यमान १६ आमदारांना डच्चू देत त्या ठिकाणी नवीन चेहरा दिला आहे. पहिल्या यादीत नऊ, तर दुसऱ्या यादीत सात आमदारांना उमेदवारी नाकारली आहे. उमेदवारी न मिळाल्याने आमदार एम. पी. कुमारस्वामी आणि आमदार नेहरू ओलेकार यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. (MLA M. P. Kumaraswami and MLA Nehru Olekar resign from BJP)

दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्यासह पाच नेत्यांनी परवाच राजीनामा दिला होता. त्यानंतर काल पुन्हा दोन आमदारांनी पक्ष सोडला आहे, त्यामुळे उमेदवारी यादी जाहीर झाल्याने बंडखोरी आणि पक्ष सोडण्याला वेग आला आहे. त्यातही काँग्रेस पेक्षा भाजपला मोठा फटका बसला आहे.

MLA M. P. Kumaraswami-MLA Nehru Olekar
Karnataka Assembly Election : कर्नाटकातील विजयासाठी काँग्रेसला महाराष्ट्रातून मोठी 'रसद'!

तिकीटापासून वंचित मुडिगेरे येथील भाजपचे आमदार एम. पी. कुमारस्वामी यांनी आमदारकीचा आणि भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. एम. पी. कुमारस्वामी यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांच्यावर तिकीट गमावल्याबद्दल संताप व्यक्त केला. सी. टी. रवीशी एकनिष्ठ राहावे लागेल, जे मी करू शकत नाही.

MLA M. P. Kumaraswami-MLA Nehru Olekar
Karnataka Election : भाजपचा आणखी सात विद्यमान आमदारांना डच्चू; २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

सी. टी. रवी हेच राज्यात भाजपचा पराभव करण्याचे कारण ठरणार आहेत. आमदार सी. टी. रवी यांनी दिल्लीत लपाछपी खेळली आहे. बी. एस. येडियुरप्पा यांनी १५ दिवस मोबाईल बंद केला, तर त्यांना ५० जागाही मिळणार नाहीत. पक्षावर मी काय अन्याय केला. जनतेची सेवा करण्याची ताकद अजूनही माझ्यात आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

ओलेकरांना धजदकडून ऑफर

भाजपचे आमदार नेहरू ओलेकर यांनीही तिकीट नाकारल्याने त्यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षाला रामराम केला. आपणास उमेदवारी डावलण्यास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. अनुसूचित जाती समाजातील ६५ वर्षीय आमदार ओलेकर आपल्याकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांसह रस्त्यावर उतरले होते. हजारो भाजप कार्यकर्ते पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचा दावा ओलेकर यांनी केला आहे.

MLA M. P. Kumaraswami-MLA Nehru Olekar
Shahjibapu's U-Turn News : शहाजीबापूंची एका दिवसात पलटी : ‘राजकारणात कुठेही असलो तरी मी शरद पवारांची फांदी..’

ते म्हणाले की, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या मताची वाट पाहू आणि त्यांच्याशी झालेल्या बैठकीच्या निकालाच्या आधारे आम्ही निर्णय घेऊ. ते पुढे म्हणाले की त्यांना धजद आणि अन्य पक्षाकडून ऑफर आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, ओलेकर यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोन वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा झाली होती. त्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com