Amit Shah-Uddhav Thackeray-Ramdas Athawale Sarkarnama
कोकण

Shivsena-BJP Yuti : भाजपने माझा प्रस्ताव मान्य केला असता तर युती तुटली नसती; केंद्रीय मंत्र्यांचा गौप्यस्फोट

Ramdas Athawale Secret Explosion : माझा प्रस्ताव त्यावेळी मान्य करण्यात आला नाही. तो माझा प्रस्ताव भाजपने मान्य केला असता तर युती तुटली नसती आणि पुढील राजकीय घडामोडी घडल्या नसत्या

Vijaykumar Dudhale

Ratnagiri, 20 September : मुख्यमंत्रिपदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची सर्वांत जुनी युती तुटली. मुख्यमंत्रिपदाचा शब्द भाजपकडून पाळला गेला नाही, तर आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता, असा आरोप शिवसेना आणि भाजपकडून झाले. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार बनविले. मात्र, त्यावर आता‘भाजपने माझा प्रस्ताव मान्य केला असता तर युती तुटली नसती, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रत्नागिरी येथे केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. त्या वेळी त्यांनी शिवसेना-भाजपची युती तुटू नये; म्हणून केलेल्या प्रयत्नांबाबत माहिती दिली.

शिवसेना आणि भाजपची युती (Yuti) टिकावी, यासाठी मी भाजपच्या (BJP) नेतृत्वाला अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, माझा प्रस्ताव त्यावेळी मान्य करण्यात आला नाही. तो माझा प्रस्ताव भाजपने मान्य केला असता तर युती तुटली नसती आणि पुढील राजकीय घडामोडी घडल्या नसत्या, असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

देशाची बदनामी करण्याचे काम विरोधी पक्षनेते राहुल गांधी परदेशात जाऊन करत आहेत. ‘आम्ही सत्तेत आलो तर आरक्षण रद्द करू’, अशी भाषा त्यांनी वापरली आहे, त्याचाही निषेध रामदास आठवले यांनी केला. लोकसभा निवडणुकीत अफवा पसरण्याचे काम महाविकास आघाडीकडून करण्यात आले. मात्र, विधानसभेला त्यांचा हा डाव उधळून टाकू आणि महायुतीला बहुमत मिळवून देऊ, असा दावाही रामदास आठवले यांनी केला.

आंबेडकरांनी महायुतीसोबत यायला हवे होते

लोकसभा निवडणुकीच्या काळात मी प्रकाश आंबेडकर यांना महायुतीसोबत येण्याचा सल्ला दिला होता. आंबेडकर हे जर महायुतीसोबत आले असते तर ते आज एखाद्या खात्याचे मंत्री झाले असते, असा विश्वासही केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT