Solapur, 20 September : सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर पहारिया यांचे नाव चर्चेत आहे. गणेशोत्सवादरम्यान त्यांनी सोलापूर शहरातील अनेक गणेश मंडळांना भेटीही दिल्या होत्या, त्यामुळे शिखर पहारिया यांच्या उमेदवारीची शक्यताही बळावली होती. मात्र, त्यावर आता ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे कुटुंबीयांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या कन्या स्मृती पहारिया यांचा शिखर पहारिया हे चिरंजीव आहेत. ते सध्या मुंबईत आपला उद्योग सांभाळत आहेत. मात्र, मध्यंतरी त्यांच्या उमेदवारीचा सोलापूरमध्ये चर्चा सुरू झाली होती. प्रणिती शिंदे या लोकसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून शिखर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे शिखर पहारिया (Shikhar Paharia) हे गणेशोत्सवात सोलापूरमध्ये (Solapur) आले होते. काही गणेश मंडळांना त्यांनी भेटीही दिल्या होत्या. रामवाडी येथील गणेश मंडळाला भेट दिल्यानंतर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी ‘सोलापूर शहर मध्य’ या मतदारसंघात शिंदे कुटुंबातील उमेदवार असावा, अशी मागणीही केली होती. त्यामुळे पहारिया यांच्या उमेदवारीबाबत एकच चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात रंगली होती.
शेखर पहारिया यांच्या उमेदवारीबाबत शिंदे कुटुंबीयाने स्पष्टीकरण दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सोलापुरातून काँग्रेसची विधानसभेची उमेदवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाच देण्यात येईल. शिखर पहारिया हे गणपती दर्शनासाठी आले होते, त्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही.
सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर पाहारिया हे विधानसभेला इच्छुक आहेत, त्यांना उमेदवारी मिळणार असल्याबद्दल सोलापूर शहरात चर्चा सुरू आहे. त्याबाबत समज गैरसमज पसरवून संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. शिखर पहारिया हे त्यांचे आजोबा सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या फार्म हाऊस येथे प्रतिष्ठापना केलेल्या गणरायाचे दर्शनासाठी सोलापूरला आले होते.
काही कार्यकर्त्यांच्या आग्रहाखर त्यांनी काही मंडळांना भेट दिली होती. मंडळांना भेटीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. त्यांनीही मी विधानसभेला इच्छुक आहे, असे कुठंही म्हटले नाही. ते मुंबईत त्यांच्या उद्योगात व्यस्त आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाच उमेदवारी देण्यात येईल, असे संकेत शिंदे परिवाराकडून देण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.