कणकवली नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप विरोधात शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात युतीबाबत चर्चा सुरू आहे.
भाजपकडून माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या नावांवर चर्चा होत आहे.
महाविकास आघाडीकडून शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी जवळपास निश्चित झाले आहे.
Kanakavali News : तळकोकणात सध्या महायुतीचे टेन्शन वाढले असून युती तुटल्यात जमा झाली आहे. अशातच येथे भाजपविरोधात विरोधकांशी हात मिळवणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं केल्याची चर्चा आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेसोबत कसलीही युती नको असा थेट आदेश पक्षातील स्थानिक नेत्यांना दिला असतानाच दुसरीकडे चोवीस तास व्हायच्या आतच शिंदे आणि ठाकरे सेना एकत्र येण्याची शक्यता तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत निर्माण झाली आहे. यामुळे येथे सध्या जोरदार खळबळ उडाली आहे.
तळकोकणातील कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले असून अद्याप येथे युती किंवा आघाडीचे चित्र स्पष्ट नाही. तर येथे भाजकडून स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. ज्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं देखील आपली देखील लढण्याची तयारी असल्याचे सांगत भाजपबरोबर जाण्यास असहमती दर्शवली आहे.
यादरम्यान स्थानिक पातळीवर मात्र भाजपला रोखण्यासह कणकवली शहराचे नगराध्यक्षपद आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपकडून कणकवलीत नगराध्यक्ष उमेदवार चाचपणी सुरू झाली असून माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची नावे आघाडीवर आहेत. यानंतरच सत्ताधारी शिंदेंची शिवसेनेकडून विरोधकांशी हात मिळवणी केली जात आहे.
कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर शहरात आता खऱ्या अर्थाने निवडणूक रणसंग्राम सुरू झाला आहे. कणकवली शहराचे नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव असून आता थेट जनतेमधून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. यामुळे भाजपकडून सध्या नलावडे आणि माजी उपनगराध्यक्ष हर्णे यांची नावे आघाडीवर आहेत.
यामुळे भाजपला रोखण्यासाठी गेल्या आठ दिवसांत कणकवली शहरात दोन्ही शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढविण्याबाबत या पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात रणनीती सुरू होती. मात्र, युती-आघाडीबाबत अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. शहरात भाजपने 17 पैकी 14 जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचे निश्चित केले आहेत.
यात युती झाल्यास शिंदे शिवसेना आणि एक जागा अजित पवार राष्ट्रवादी गटाला सोडण्याचे निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने उमेदवारही जवळपास निश्चित झाले आहेत. नगरपंचायतीसाठी एक सदस्यीय प्रभाग रचना आहे. त्यामुळे सर्व 17 प्रभागांमध्ये एकास एक लढत होण्याची शक्यता आहे. कणकवली नगरपंचायतीची प्रभाग रचना ही 2011 च्या जनगनणेत असलेल्या 16 हजार 398 या लोकसंख्येनुसार केली आहे.
गतवेळेस शहर विकास आघाडी, शिवसेना-भाजप युती आणि महाराष्ट्र स्वाभिमान अशा तीन पक्षांमध्ये निवडणूक लढविण्यात आली होती. यंदा मात्र शहर विकास आघाडी स्थापन करण्याबाबत अद्याप कुणीही पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे भाजप विरोधात ठाकरे शिवसेना आघाडी अशाच लढती होण्याची शक्यता आहे.
आठ दिवसांत तोडगा निघणार
यापूर्वी 2018 मध्ये कणकवली नगरपंचायतीची निवडणूक झाली होती. यात थेट जनतेमधून स्वाभिमान पक्षाचे समीर नलावडे 37 मतांनी निवडून आले होते. तर स्वाभिमान पक्षाचे 10, राष्ट्रवादी पक्षाचा 1, शिवसेना 3 आणि भाजप 3 असे पक्षीय बलाबल होते. यंदा युती-आघाडीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील आठ दिवसांत यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
1. कणकवली निवडणुकीसाठी कोणकोणते पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे?
शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे.
2. भाजपकडून कोणत्या नेत्यांची नावे चर्चेत आहेत?
भाजपकडून माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची नावे चर्चेत आहेत.
3. महाविकास आघाडीकडून संभाव्य उमेदवार कोण आहेत?
शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.
4. युतीबाबत अंतिम निर्णय झाला आहे का?
अजून युतीबाबत अंतिम निर्णय झालेला नाही, चर्चा सुरू आहे.
5. या निवडणुकीचा प्रभाव कोणत्या पातळीवर पडू शकतो?
या निवडणुकीचा प्रभाव कोकणातील महायुतीच्या आगामी समीकरणांवर आणि राज्यातील स्थानिक निवडणुकांवर दिसू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.