Municipal Elections 2025 : महापालिका निवडणूक लांबणीवर पडणार? 'हे' कारण ठरणार कारणीभूत!

Maharashtra Municipal Corporation Elections: नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. मात्र, महापालिका निवडणुकीची घोषणा झालेली नाही. ही निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
municipal election update 2025
municipal election update 2025Sarkarnama
Published on
Updated on

why municipal elections may get delayed in 2025: नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता आचारसंहिता लागू झाली असून निवडणुकीची धामधूम देखील सुरू झाली आहे. त्यामुळे या भागातील इच्छुक कार्यकर्ते उत्साहात असतानाच महापालिका क्षेत्रातील निवडणुका आणखी काही काळ पुढे ढकलली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे. या निकालानंतर लगेचच राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 ते 19 डिसेंबर यादरम्यान होणार आहे.

त्यामुळे या अधिवेशन कालावधीत कोणत्याही नव्या निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून होण्याची शक्यता नाही. त्यामुळे महापालिका निवडणुका पुन्हा एकदा आणखी काही काळ लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासोबतच इतरही कारण महापालिका निवडणूक लांबणीवर पडण्यासाठी कारणीभूत ठरणार आहेत.

नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार असून त्यानंतर लगेचच 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यानंतर राज्य प्रशासन लगेचच हिवाळी अधिवेशनाच्या कामाकडे वळणार आहे.

अधिवेशनाच्या काळात निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्याची प्रथा नसल्याने, महापालिका तसेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे वेळापत्रक निवडणूक आयोगाकडून आता अधिवेशनानंतरच म्हणजेच 19 डिसेंबरनंतरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आयोगावर वेळेत निवडणूक घेण्याच बंधन असला तरी अधिवेशन, कर्मचारी यंत्रणेवरील दबाव आणि निवडणूक कार्यक्रमांच्या ओव्हरलॅपमुळे आयोगाकडून रोज सर्वोच्च न्यायालयाकडे मुदतवाढ मागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

municipal election update 2025
Uddhav Thackeray Video : 'त्या' चर्चांमधील उद्धव ठाकरेंनी हवाच काढली; एकनाथ शिंदेंसोबत युतीबाबत स्पष्ट संदेश, म्हणाले 'निवडणुकीनंतरही...'

१४ महानगरपालिका निवडणुकीच्या प्रतीक्षेत...

सध्या महाराष्ट्रातील १४ महानगरपालिका तसेच २५० पेक्षा जास्त नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका प्रलंबित आहेत. स्थानिक सत्तासंघर्ष आणि सतत बदलणाऱ्या राजकीय गणितामुळे या निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष खिळले आहे. पण आता हिवाळी अधिवेशन सुरू झाल्याने महापालिका निवडणुकांचा बिगुल पुन्हा काही महिन्यांसाठी लांबणीवर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

municipal election update 2025
Ambarnath Politics : एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यातच अडवण्यासाठी भाजपची 'फिल्डिंग'; निवडणूक जाहीर होताच स्वबळाचा नारा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com