Khopoli municipality news : खोपोली नगरपालिका नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोख यांच्या हत्येला राजकीय वळण लागलं आहे. या हत्येत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे कट्टर कार्यकर्ते तथा जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे याच्यासह दहा जणांविरोधात खोपोली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
प्रत्यक्ष हत्या करणे, हत्येचा कट रचणे, अशा वेगवेगवेळ्या कलमांनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर सकाळपासून खोपोलीतील व्यवहार ठप्प असून, गुन्ह्यातील आरोपींना अटक होईपर्यंत अत्यंविधी करणार नसल्याचा इशारा एकनाथ शिंदे शिवसेना समर्थकांनी दिला आहे.
सुधाकर घारे हे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक आहेत. कर्जत विधानसभेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढली होती. यावेळी पाच हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. मंगेश काळोखे यांची हत्या होताच, ही हत्या राजकीय कारणांतून झाली असून, यामागे राष्ट्रवादी स्थानिक नेते असल्याची चर्चेने जोर पकडला होता.
मंगेश कोळोखे यांची आज सकाळी काळ्या वाहनातून आलेल्या तीन ते चार जणांनी केली. यानंतर खोपोलीत एकच खळबळ उडाली. एकनाथ शिंदे शिवसेना (Shivsena) समर्थक आणि काळोखे यांचे नातेवाईक हे खोपोली पोलिस ठाण्यात सकाळपासून तळ ठोकून बसले आहेत. पोलिस ठाण्यात वाढलेल्या जमावामुळे पोलिसांना जमाविरोधात सौम्य बळाचा वापर करावा लागला. यावेळी पोलिसांबरोबर जमावाची धक्काबुकी देखील झाली.
मंगेश कोळोखे यांच्या हत्येतील आरोपींना जोरपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत अंत्यविधी न करण्याचा इशारा एकनाथ शिंदे शिवसेना आणि काळोखे यांच्या समर्थकांनी दिला. दरम्यान, खोपोली पोलिसांनी काळोखे यांच्या हत्येतील आरोपीच्या शोधासाठी पथकांना रवाना केलं. तसंच स्थानिक गुन्हे शाखेने देखील समांतर तपास केला. पोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही जप्त केलं असून, या मागे राजकीय कनेक्शन असल्याचे प्राथमिक तपास समोर येत असल्याचे सांगितले होते.
पोलिसांनी प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोरांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे, राष्ट्रवादी जिल्हा प्रवक्ते भरत यांच्यासह एकूण 10 जणांविरोधात दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्ष हत्या करणारे आणि कट रचणारे, अशा विविध कलमांनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुधाकर घारे हे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक आहेत.
दरम्यान, काळेखे यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख राजकीय नेता अडचणीत येऊ शकतो, असे सांगितले जात आहे. यात सुधाकर घारे हा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचा कट्टर कार्यकर्ता आहे. हत्येचा कट करणे, हत्या करणे अशा कलमांनुसार गुन्हा दाखल आहे.
बीडमधील संतोष देशमुख हत्येप्रकरणावरून राष्ट्रवादी धनंजय मुंडे यांना जशी राजकीय अडचण झाली होती, तशीच सुनील तटकरेंभोवती राजकीय गदारोळ होण्याची शक्यता आहे. राज्यात महापालिका निवडणुकांचे वातावरण आहे. या राजकीय घमासानमध्ये ही हत्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीची ठरू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.