Kiran Samant, Narayan Rane, Vinayak Raut sarkarnama
कोकण

Loksabha Election 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिंदे गट आशावादी; नारायण राणेंची भूमिका आज ठरणार...

Umesh Bambare-Patil

Kokan Political News : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. आज दिवसभर बैठकांचा सिलसिला सुरू राहणार आहे, तर ठाकरे गटदेखील प्रचारात आघाडीवर असून, विनायक राऊत यांच्याकडूनदेखील जिल्ह परिषद गटनिहाय बैठका सुरू आहेत. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिलेदार मात्र अद्याप मुंबईतच ठाण मांडून असून, ही जागा मिळेल यासाठी अजूनही आशावादी दिसत आहेत, तर आज संध्याकाळी पाच वाजता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईत पत्रकार परिषद होणार असून, यामध्ये ते लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोकणातील रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात यावेळेस सर्वांनीच ताकद लावली आहे. ही जागा मिळावी म्हणून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. भाजपकडून या जागेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे इच्छुक आहेत. पण, जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने त्यांचीही भूमिका स्पष्ट झालेली नाही. आज सायंकाळी पाच वाजता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये ते आपली भूमिका स्पष्ट करतील.

नारायण राणे नेमकं काय बोलणार, याची उत्सुकता आहे. लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत काय भूमिका मांडणार यावरही उलटसुलट चर्चा सुरू आहे. भाजपचे स्थानिक पदाधिकारीही या जागेबाबत आग्रही असून, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपाचे या लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी माजी आमदार प्रमोद जठार हे नावं चर्चेत आहे.

महायुतीकडून उमेदवाराचं नाव जाहीर होण्यास उशीर होत आहे, तशी नवनवीन नावं चर्चेमध्ये पुढे येत आहेत. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचाही या जागेवर दावा आहे. त्यासाठी शिंदे यांचे शिलेदार मुंबईतच ठाण मांडून बसले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी ही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण ते धनुष्यबाण चिन्हावरच निवडणूक लढण्यास आग्रही आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पण, विरोधात उद्धव ठाकरे Udhav Thackeray गट शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याशी मुकाबला करण्यासारखा उमेदवार अद्यापतरी शिंदेंच्या शिवसेनेकडे दिसत नाही. तरीही शिंदेंची शिवसेना ही जागा मिळेल यासाठी अजूनही आशावादी दिसत आहे. या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटदेखील आक्रमक असून, त्यांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. उमेदवार विनायक राऊत यांनी जिल्हा परिषद गटनिहाय बैठकांचा सिलसिला सुरू ठेवला आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT