Sharad Pawar News : सरकारकडून विरोधी पक्षांची कोंडी करण्यात येत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हेदेखील कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत. काँग्रेसने आयकर भरला नाही म्हणून त्यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर 'इंडिया' आघाडीतर्फे रविवारी (31 मार्च) दिल्लीत 'सेव्ह डेमोक्रेसी रॅली' काढण्यात येणार आहे. या महारॅलीला इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातून शरद पवार (Sharad Pawar ) तसेच उद्धव ठाकरे या महारॅलीला उपस्थित राहणार आहेत.
रामलीला मैदानावर रॅली काढण्यास आम आदमी (AAP) पक्षाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे. या रॅलीत इंडिया आघाडीतील 28 पक्ष सहभागी होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे विरोधी पक्षातील नेत्यांना खोट्या आरोपाखाली तुरुंगात टाकत आहेत. निवडणुकीत पराभूत होण्याच्या भीतीने मोदी हे करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी केला.
ही रॅली कोणत्या विशिष्ट व्यक्तीच्या विरोधात नाही. ही रॅली लोकशाही वाचवण्यासाठी आहे. पंतप्रधानांना विरोधी पक्षांना राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत करायचे आहे, असे काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले. तर ईडीच्या आधारे भाजपला निवडणूक जिंकायची आहे. त्यांना लोकशाही प्रक्रिया थांबवायची आहे, असे काँग्रेस नेते प्रियांक खर्गे म्हणाले.
तृणमूल काँग्रेस इंडिया आघाडीत नाही. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे ते इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार की नाही, याविषयी चर्चा आहेत. मात्र, तृणमूल काँग्रेसचे दोन प्रतिनिधी या रॅलीला ममता बॅनर्जी पाठवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
रॅलीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे, आरजेडी नेते तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, सीपीआय (एम) सरचिटणीस सीताराम येचुरी, सीपीआयचे सरचिटणीस डी राजा, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव. द्रमुकचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.