Mahad Rada case; police inspector ramesh tadvi sarkarnama
कोकण

Raigad Crime : महाड राड्यात मंत्र्यांचा मुलगा आरोपी, अन् तपास करणाऱ्या पोलिसाचाच आत्महत्येचा इशारा; रायगडात नेमकं घडतंय काय?

mahad police inspector ramesh tadvi suicide warning letter : रायगडच्या महाड राड्या प्रकरणात वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून पोलीस निरीक्षकानेच धक्कादायक पाऊल उचलले आहे. या पोलीस निरीक्षकाने कुटुंबासह आत्महत्या करणार असल्याचा इशारा देत पोलीस महासंचालकांना पत्र लिहिल्याने खळबळ उडाली आहे.

Aslam Shanedivan

  1. रमेश तडवी यांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून कुटुंबियांसह आत्महत्येचा इशारा देणारे पत्र पोलिस प्रमुखांना पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे.

  2. बदली, जातीवाचक टोमणे, मानसिक छळ आणि बेकायदेशीर दबावाचे आरोप पत्रात करण्यात आले आहेत.

  3. या पत्रात भरत गोगावले यांच्या मुलाचा उल्लेख असल्याने प्रकरणामुळे रायगडमधील राजकीय आणि प्रशासकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

Mahad Rada case : रायगडच्या महाड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक रमेश तडवी यांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून कुटुंबियांसह आत्महत्या करणार असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत तडवी यांनी पोलीस महासंचालकांना पत्र पाठवलं असून त्यांनी या पत्रात पोलिस निरिक्षक पदावरून नियंत्रण कक्ष अलिबागला बदली करण्यात आल्याचे म्हटलं आहे.

2 वर्षात दोनदा बदलीमुळे व्यथित झालो आहोत. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाचा उल्लेख करत त्या राड्यात वरिष्ठांच्या आदेश न पाळल्यानेच आपल्यावर जाणीवपूर्वक कारवाई केली गेली. आपल्यावर जातीवाचक टोमणे देत हीन वागणूक आणि मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप पत्रात केला आहे. आता हे पत्र चांगलेच व्हायरल होत असून यामुळे गोगावले अडचणीत येण्याची शक्यता असून रायगड पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.

तडवी यांनी पत्रात म्हंटल्यानुसार, त्यांची जानेवारी 2024 मध्ये ठाणे ग्रामीणमधून रायगड जिल्हा पोलीस नियत्रंण कक्षात बदली झाली होती. त्यानंतर जानेवारी 2025 मध्येच महाड शहर पोलीस ठाण्यात प्रभारी म्हणून बदली झाली होती. आता याच पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पिळकवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आपण चार्ज घेताच पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जातीवाचक विधान करत हीन वागणूक द्यायला सुरुवात झाली. शिवाय वरिष्ठांनी पोलीस अधिक्षकांकडे मी कर्तव्यात कसूर केल्याचा खोटा अहवालही दिला. वरिष्ठांच्या खोट्या अहवालाने माझी बदली महाड शहर पोलीस ठाण्यातून पुन्हा पोलीस नियंत्रण कक्षात केली.

त्याविरुद्ध मॅट कोर्टात गेल्यानंतर बदली आदेशाला स्थगिती देत पुनश्च महाड स्टेशनला बदली करण्याचा आदेश दिला गेला. पण अधीक्षकांनी हायकोर्टात याविरोधात याचिका दाखल केली. तिथेही माझ्या बाजूने निकाल लागल्यानंतर शेवटी माझी सप्टेंबर 2025 मध्ये महाड शहर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी म्हणून पुन्हा बदली करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर पुन्हा जातीवाचक शिवीगाळ सुरु झाली. माझी पोलीस अधिक्षक ऑचल दलाल यांचेकडे बदनामी करण्यास सुरवात केली. यामुळे अनेकदा आत्महत्येचा विचार मनात आला. परंतु. मी माझे कुटुंबाकडे पाहून आत्महत्या केली नाही. केवळ परिस्थिती हालाखीची असल्याने आपण त्रास सहन केला, असेही तडवी यांनी म्हंटलं आहे.

शिवसेना मंत्री भरत गोगावले यांचाही उल्लेख तडवी यांनी केला आहे. महाड नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात वाद झाला होता. येथे गोगावले यांचे पुत्र विकास यांच्यावर बंदूक ताण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. येथे गाड्या देखील फोडण्यात आल्या होत्या. ज्यानंतर दोन्ही पक्षांनी परस्पर विरोधी गन्हे दाखल केले होते.

यात गुन्ह्यात मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर आरोप निश्चित करून गुन्हे दाखल करण्यात आले होते. पण यावेळी गोगावले यांच्या मुलास मदत करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी दबाव टाकला. तसेच तिघांना अटक करण्यासाठी दबाव वाढवला. पण आपण यासाठी तयार होत नसल्याचे समोर येताच आपली बदनामी करण्यास सुरुवात झाल्याचा दावाही पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी केलाय.

शिवथरे, काळे आणि खोपडे यांचे 3 अनोखळी इसमांना अटक करण्याचे आदेश असतानाही ते न ऐकल्यानेच आता त्रास दिला जात आहे. या सतत होणाऱ्या अन्यायामुळे कुटुंबाला सुद्धा त्रास होत असून आपण कुटुंबासह आत्महत्या करत असून वरिष्ठांनी दिलेला त्रासच याला जबाबदार असेल असाही सूचक इशारा पत्रात रमेश तडवी यांनी दिला आहे. या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे.

FAQs :

1. रमेश तडवी यांनी कोणता इशारा दिला आहे?
वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून कुटुंबासह आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी पत्राद्वारे दिला आहे.

2. तडवी यांनी पत्र कुणाला पाठवले आहे?
हे पत्र पोलीस महासंचालकांना पाठवले असल्याची माहिती आहे.

3. पत्रात कोणते आरोप करण्यात आले आहेत?
जातीवाचक टोमणे, मानसिक छळ, बदली आणि बेकायदेशीर दबावाचे आरोप करण्यात आले आहेत.

4. या प्रकरणात मंत्रीपुत्राचा उल्लेख का चर्चेत आहे?
महाड राडा प्रकरणात आरोपी असलेल्या मंत्रीपुत्राला सहकार्य करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप पत्रात असल्याने चर्चा रंगली आहे.

5. या घटनेचा पुढील परिणाम काय होऊ शकतो?
प्रशासकीय चौकशी होण्याची शक्यता असून रायगड पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT