कीये ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी वैशाली मालुसरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड होण्याची शक्यता आहे.
मंत्री भरत गोगावले यांच्या कुटुंबातील आणखी एक सदस्य राजकारणात प्रवेश करत आहे.
Raigad News : रायगड जिल्ह्यात निवडणुकींचा बिगूल वाजला असून जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतींमधील २०० रिक्त जागांसाठी (३० सरपंच आणि १७० सदस्य) पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. २८ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून, २९ एप्रिल २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. सध्या उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून स्थानिक पातळीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
दरम्यान आता पुन्हा एकदा राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्यावर गुलाल पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांची ज्येष्ठ कन्या वैशाली सुनील मालुसरे यांनी महाड तालुक्यातील किये ग्रामंचायतच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी दंड थोपाटले आहेत. तर त्यांच्या विरोधात कोणीच अर्ज दाखल केलेला नाही. यामुळे ही निवडणूक बिनविरोध होऊन होऊ शकते. विद्यमान सरपंच नंदा विष्णू गोगावले यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर किये ग्रामपंचायत सरपंच पदासाठी पोटनिवडणूक लागली आहे.
नुकताच राज्यातील राजकारणात लक्षवेधी ठरणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी मतदारसंघातून रंगतदार लढत पाहायला मिळाली होती. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना मोठा धक्का देत मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी विजय मिळवला होता. ज्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता. अद्याप या जल्लोषाची चर्चा कमी झालेली नाही. तोच आता पुन्हा एकदा नव्याने गोगावले कुटुंबावर गुलाल पडण्याची शक्यता आहे.
महाड तालुक्यातील किये ग्रामंचायतच्या विद्यमान सरपंच नंदा विष्णू गोगावले यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला. यानंतर आता किये ग्रामपंचायत सरपंच पदासाठी पोटनिवडणूक लागली आहे. तर गोगावले यांच्या ज्येष्ठ कन्या वैशाली सुनील मालुसरे यांनी या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
या पोटनिवडणुकीसाठी अद्याप इतर कोणी अर्ज दाखल केलेला नाही. यामुळे ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते. तसेच वैशाली गोगावले मालुसरे या कीय ग्रामपंचायतीत सरपंच पदावर विराजमान होतील, अशी शक्यता आहे. असे झाल्यास गोगावले कुटुंबातील आणखीन एक सदस्य राजकारणात येईल.
वैशालीताई गोगावले यांनी यापूर्वी देखील एकदा सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सामोरे गेल्या होत्या. पण त्यावेळी गोगावले यांनी आपल्या कार्यकर्त्याला उमेदवारी देत सरपंच केले होते. गोगावले यांनी कन्येवरील प्रेम बाजूला सारत शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विचार केला होता.
पण आता वैशाली गोगावले मालुसरे यांनी सरपंच पदासाठी पुन्हा एकदा दंड थोपाटले आहेत. तर त्यांना अर्ज भरताना युवासेना कोअरकमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या सौभाग्यवती साधना गोगावले उपस्थित राहत ताकद दिली आहे. यावेळी वैशाली यांच्या मागे गोगावले कुटुंबाची ताकद असल्याचे उघड झाले आहे. यामुळे वैशाली गोगावले मालुसरे यांची कीये ग्रामपंचायत सरपंच पदावर बिनविरोध निवड होईल अशी चर्चा आहे.
1. कोण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे?
वैशाली सुनील मालुसरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
2. ही कोणत्या निवडणुकीबाबत आहे?
कीये ग्रामपंचायत पोटनिवडणुकीबाबत ही माहिती आहे.
3. बिनविरोध निवड होण्याची शक्यता का आहे?
कारण आतापर्यंत फक्त एकच अर्ज दाखल झाला आहे.
4. वैशाली मालुसरे कोण आहेत?
त्या मंत्री भरत गोगावले यांच्या कन्या आहेत.
5. या घटनेचा राजकारणावर काय परिणाम होईल?
स्थानिक राजकारणात गोगावले कुटुंबाचा प्रभाव अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.