भरत गोगावले यांनी स्पष्टपणे सांगितले की राष्ट्रवादीसोबत युती नको आणि भाजपसोबत लढण्यास कार्यकर्ते तयार आहेत.
त्यांनी इशारा दिला की, जर भाजपसोबत युती झाली नाही, तर स्वबळावर निवडणुका लढवू.
महायुतीमध्ये सध्या चर्चा सुरू असून, योग्य वेळ आल्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.
Raigad News : सध्या नगरपालिकांच्या निवडणुकींच्या रणधुमाळीला वेग आला असून आज पासून नामांकन भरण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे कोकणात महायुतीसह महाविकास आघाडीतील नेत्यांची दमछाक होताना दिसत आहे. अशातच आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समित्यांसह महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे देखील पक्षाचे नेते नजर ठेवून असल्याने जिल्ह्यातील राजकारण आता चांगलेच तापू लागलेले आहे. अशातच युती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर लढण्याचा इशाराच राष्ट्रवादी, शिंदे शिवसेने परस्परांना दिल्याने निवडणुका रंगतदार वळणार पोहचली आहे.
अशावेळी सिवसेना नेते तथा रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी थेट राष्ट्रवादीशी संबंध तोडणारे वक्तव्य केलं आहे. त्यांनी राष्ट्रवादीपेक्षा भाजपसमवेत युती करुन निवडणुका लढवू, असे म्हटलं आहे. यामुळे जिल्ह्यात होवू घातलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत महायुती होणार नाही असेच स्पष्ट झाले असून येथे राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना असाच सामना रंगणार हे देखील समोर आले आहे.
यावेळी गोगावले यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढवाव्यात असे वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वीच सुचित केल्याचे सांगितले. पण राष्ट्रवादीबरोबर आपले (शिवसेना) पटत नाही, हे जग जाहीर झाले आहे. तर जागा वाटपाचा फार्म्युला राष्ट्रवादी मानायला तयार नाही. यामुळे देखील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील मतभेद समोर आले आहेत. यामुळे स्थानिकच्या निवडणुकीत राष्ट्रवादीशी युती नकोच असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तसेच कार्यकर्त्यांनीच राष्ट्रवादीपेक्षा भाजपबरोबर आघाडी करायला आम्ही तयार असल्याचे सांगितले आहे. मात्र बाजप देखील युतीसाठी तयार नसेल. तर मग आम्ही स्वबळावर या निवडणुका लढवू, असा इशाराच गोगावले यांनी भाजपला यावेळी दिला आहे. याशिवाय गोगावले यांनी अजून महायुतीत वरिष्ठ नेत्यांची चर्चा सुरू असून त्यात काय मार्ग निघतो? काय निष्पन्न होते हे पाहून पुढचा निर्णय घेवू असे देखील त्यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादीचीही भाजपला पसंती
दरम्यान फक्त एकीकडेच नकार घंटा वाजत आहे असे नाही तर शिवसेनेशी युती करण्यास राष्ट्रवादीही तयार नाही. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते हे युतीसाठी भाजपला पसंती देताना दिसत आहेत. आगामी निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला सोबत न घेता भाजपसोबत युती करण्याचा आग्रह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे बैठकीत केल्याची चर्चा आहे. तर पक्षाने स्थानिक नेत्यांना युतीबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिल्याचेही येथे चर्चा आहे.
दरम्यान रायगडमध्ये मंत्री गोगावलेंसह आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे यांचा पूर्वीपासूनच राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना कडवा विरोध राहिला आहे. त्यातच पालकमंत्रीपदावरून सुरू झालेला वादाने यात तेल ओतण्याचे काम केलं असून येथे मागील काही दिवसांपासून येथे राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद चिघळताना दिसत आहे. आतातर गोगावले यांनी राष्ट्रवादीशी युती नाहीच असा पवित्रा घेत भाजपला देखील युतीसाठी शेवटची संधी दिली आहे. यामुळे स्थानिक राजकारणाची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
1. भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीबद्दल काय म्हटलं?
त्यांनी स्पष्ट सांगितले की राष्ट्रवादीशी आमचे पटत नाही आणि त्यांच्यासोबत युती नको.
2. त्यांनी कोणत्या पक्षासोबत युती करण्याचा प्रस्ताव दिला?
गोगावले यांनी भाजपसोबत युती करण्यास प्राधान्य दिले आहे.
3. जर भाजपसोबत युती झाली नाही तर काय होईल?
त्यांनी सांगितले की अशा परिस्थितीत आम्ही स्वबळावर निवडणुका लढवू.
4. हा मुद्दा कोणत्या बैठकीत मांडला गेला?
हा मुद्दा गोगावले यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत मांडला.
5. सध्या महायुतीत काय स्थिती आहे?
महायुतीत अजून चर्चा सुरू आहे आणि त्यातून काय निष्पन्न होते हे पाहून निर्णय घेतला जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.