Bharat Gogawale : राष्ट्रवादीवर शिवसेनेचा वार! तटकरेंच्या गोटातील कट्टर नेता गोगावलेंनी फोडला

Bharat Gogawale Vs Sunil Tatkare Raigad Politics And Vikas Gaikwad joins Shivsena : रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वाद आता विकोपाला गेला आहे. या वादाचे सडसाद आता पक्ष फोडण्यापर्यंत गेले आहे.
Sunil Tatkare Bharat Gogawale
Sunil Tatkare Bharat GogawaleSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. रायगडमध्ये भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना मोठा राजकीय धक्का दिला आहे.

  2. तटकरेंचे कट्टर समर्थकाने शिवसेनेत प्रवेश केला आहे.

  3. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा राजकीय घडामोड मानली जात आहे.

Raigad news : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल काही दिवसांतच वाजणार आहे. त्याआधी येथे राजकीय पक्षांकडून आकड्यांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादाची झळही दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांना लक्ष्य करण्याचा सत्ताधाऱ्यांचा ट्रेंड आता मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याकडे वळला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री भरत गोगावले यांनी सत्तेत असलेल्या मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. त्यांनी सुनील तटकरेंना मोठा झटका देत त्यांचे कट्टर समर्थक असलेल्या एका नेत्याचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणला आहे. यामुळे महायुतीला तडा जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काहीच दिवसांपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील वादाची धार कमी करण्याचा प्रयत्न भरत गोगावले यांनी केला होता. त्यांनी आगामी स्थानिक निवडणुकांसाठी रणनीती आखत, “ही निवडणूक महायुती म्हणूनच लढवायची आहे,” असे स्पष्ट केले होते. तसेच जिल्ह्यातील जागांची समान वाटणी करण्याचा प्रस्ताव देत युतीचा हात पुढे केला होता. मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी, “असा कोणताही प्रस्ताव आमच्यापर्यंत आलेला नाही. जे आत्तापर्यंत खालच्या थराला जाऊन टीका करत होते, त्यांनी कसा काय प्रस्ताव दिला?” असा सवाल उपस्थित केला होता.

Sunil Tatkare Bharat Gogawale
Bharat Gogawale : राजकीय वर्तुळात खळबळ! रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी युती? भरत गोगावलेंनी एका वाक्यातच संपवला विषय

दरम्यान आता गोगावले यांनी तटकरे यांना गोरेगाव-लोणेरे जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय झटका दिला आहे. तटकरे यांचे कट्टर समर्थक, कार्यकर्ते आणि स्थानिक नेता अशी ओळख असलेल्या विकास गायकवाड यांना त्यांनी फोडले आहे. गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करून घेतला आहे.

हा प्रवेश आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रवेशामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर गोरेगाव विभागात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडल्याची चर्चा सुरू आहे. तर मंत्री गोगावले यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राजकीय धमाका केल्याचे बोलले जात आहे.

सध्या रायगडमध्ये महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. पालकमंत्रीपदाचा वाद हा आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या राजकारणातही दिसू लागला आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या या दोन दिग्गजांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकेत आता एकमेकांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

आता शिवसेनेकडून राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून, तटकरे यांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीचा हा प्रवेश तटकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Sunil Tatkare Bharat Gogawale
Bharat Gogawale : अखेर गोगावलेंच्या खात्याला 'रोजगार' मिळाला : फडणवीस अन् अजितदादांनी दिली नवी जबाबदारी

FAQs in Marathi:

1. प्रश्न: रायगडमध्ये शिवसेनेत कोणाचा प्रवेश झाला?
उत्तर: तटकरेंचे कट्टर समर्थक विकास गायकवाड यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

2. प्रश्न: हा प्रवेश कोणी करून घेतला?
उत्तर: मंत्री आणि शिवसेना नेते भरत गोगावले यांनी हा प्रवेश घडवून आणला.

3. प्रश्न: या प्रवेशाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
उत्तर: राष्ट्रवादी काँग्रेसला रायगडमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

4. प्रश्न: या प्रवेशाचा स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर काय परिणाम होईल?
उत्तर: शिवसेनेचे वर्चस्व वाढू शकते आणि महायुतीत तणाव निर्माण होऊ शकतो.

5. प्रश्न: या प्रकरणावर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे का?
उत्तर: अद्याप तटकरेंकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com