Sindhudurga News : माजी मुख्यमंत्री तशा शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकण दौऱ्यात भाजपा नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली होती. या टीकेला आता नारायण राणे यांनी हे प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्यावर टीका केल्याशिवाय ठाकरेंना ऐकणार तरी कोण असा सवाल करत त्यांचा एकेरी उल्लेखही केला. अडीच वर्ष मुख्यमंत्री होता, त्या कारकिर्दीत तू सिंधुदुर्गसाठी काय केलं असंही ते म्हणाले.
केंंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांचाही खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, "कोण तरी भास्कर जाधव आणला भाडोत्री माझ्यावर टीका करण्यासाठी मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. पण एक दिवस चोप मात्र नक्की देणार, असे राणे म्हणाले. याचवेळी त्यांनी भास्करने माझ्याकडून 15 लाख रुपये इलेक्शनला घेतले,ते अजूनपर्यंत परत दिले नाही आणि तो माझ्यावर टीका करतो अशा शब्दात भास्कर जाधव यांना राणे यांनी सुनावले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमात राणे बोलत होते.
महाराष्ट्रात एकमेव टँकर मुक्त केलेला हा सिंधुदुर्ग जिल्हा आपण टँकर मुक्त केला. जिल्ह्यातील चारही धरण आपण सुरू केली. मी मुख्यमंत्री असताना 28 ब्रिज केले. त्यावेळेला उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे होते त्यांनीही मला विचारलं राणेसाहेब काय करताय मी म्हटलं हो मला 28 ब्रीजला पैसे द्यायचे आहेत मी कोणाचाही ऐकलं नाही असा एक किस्सा राणे यांनी सांगितला. माझा जिल्हा माझं कोकण कोकणी माणूस याच्या मी कोणालाही आड एवढे दिवस येऊ दिले नाही पण या माणसाने एक तरी काही केलं का असा खडा सवालच उद्धव ठाकरे यांना राणे यांनी उपस्थित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कार्याचे कौतुक करत मोदी यांनी चार कोटी लोकांना घर दिली 11 कोटी लोकांना घरात पाणी दिलं. उद्धव ठाकरे यांनी आजवर कोणासाठी काय केलं कोणाला घर बांधण्यासाठी पैसे तरी दिले का ? असा खडा सवालच राणे यांनी उपस्थित केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नारायण राणे यांनी आमदार भास्कर जाधवांना टीकेची तोफ डागली. ते म्हणाले, मी बाळासाहेबांना जाधव यांना तिकीट द्यायला लावलं. बिचाऱ्या त्या खेडेकरला बाजूला काढले, तेव्हा हा माझ्या घरी आला. दादा प्रचाराला पैसे नाहीत. मी विचारलं, किती लागतील दहा लाख एकदा व पाच लाख एकदा असे एकूण पंधरा लाख घेऊन गेला, पण द्यायची दानत नाही. आता तोच माझ्यावर टीका करतो अशा शब्दात राणे यांनी भास्कर जाधव यांचाही समाचार घेतला आहे. पण मी समर्थ आहे उत्तर द्यायला आणि त्याला अद्दल घडवायला असाही इशारा राणे यांनी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना दिला आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.