Narayan Rane : भाजप खासदाराचा इंग्रजीतून प्रश्न, नारायण राणेंची उडाली भंबेरी; दिलं वेगळंच उत्तर

Narayan Rane In Rajyasabha : राणेंनी उत्तर दिल्यानंतर खासदारांनी एकच गोंधळ घातला. यावेळी पीठासीन अध्यक्षांनी मध्यस्ती केली अन्...
Narayan rane
Narayan raneSarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीचं ( Loksabha Election 2024 ) बिगूल काही दिवसांत वाजणार आहे. त्यापूर्वी नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचं संसदीय अधिवेशन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाला सोमवारी ( 5 फेब्रुवारी ) उत्तर दिलं. यानंतर लघू आणि सूक्ष्म-लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना भाजप खासदारानं विचारलेल्या एक प्रश्न विचारला. यावेळी नारायण राणे यांची भंबेरी उडाल्याचं पहायला मिळालं.

Narayan rane
Maratha Reservation : आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेबाबत राहुल गांधींची मोठी घोषणा

राज्यसभेतील भाजप खासदार कार्तिकेय शर्मा यांनी नारायण राणे ( Narayan Rane ) यांना सूक्ष्म लघू आणि मध्य उद्योग मंत्रालयासंदर्भात ( एमएसएमई ) प्रश्न विचारला. "एमएसएमई क्षेत्रातील कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारनं कोणती पावले उचलली आहेत?" असा प्रश्न शर्मा यांनी इंग्रजीतून विचारल्यानं राणे गडबडले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार कार्तिकेय शर्मा यांनी विचारलेला प्रश्न नारायण राणेंना कळलाच नाही. नारायण राणे म्हणाले, "एमएसएमई क्षेत्रात निर्यात वाढविण्यासाठी सरकारकडून 'मेक इंडिया योजनें'तर्गत विविध कार्यक्रम आखण्यात आलेले आहेत." पण, यावेळी शर्मा यांनी विचारलेला प्रश्न एक आणि राणे यांचं उत्तर वेगळे असल्याचं खासदारांच्या लक्षात आल्यानं एकच गोंधळ घातला.

Narayan rane
Rajya Sabha Election 2024 : कुमार विश्वास यांना राज्यसभेची उमेदवारी? भाजप देणार धक्का...

यानंतर राज्यसभेचे उपाध्यक्ष पीठासीन अधिकारी हरिवंश नारायण सिंह यांनी कार्तिकेय यांनी नेमका काय प्रश्न विचारला, हे राणेंना हिंदीतून सांगितलं. त्यावर "क्या... काय केलं..." असं राणेंनी म्हणलं. तसेच, गोंधळ घालत असलेल्या खासदारांना "तुम्ही ऐकून घ्या," असंही राणेंनी सांगितलं.

Narayan rane
Lok Sabha Election 2024 : केसीआर यांना तीन दिवसांत दुसरा मोठा दणका; खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश  

"मी जे वाचून दाखवत आहे, ते उद्योग सुरू झाल्यानं कामगारांना फायदा होणार आहे. कंपनी बंद राहिली तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटतील का?" असं राणे म्हणाले.

Narayan rane
Rahul Gandhi News : भाजपनं पराचा कावळा केला! श्वानाच्या व्हायरल व्हिडिओवर राहुल गांधी भडकले

त्यावर, "अधिकारी कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारनं कोणती पावले उचलली आहेत? हे तुम्ही कार्तिकेय शर्मा यांना बोलावून सांगा," अशा सूचना पीठासीन अधिकारी हरिवंश नारायण सिंह यांनी नारायण राणेंना दिल्या.

Narayan rane
Loksabha Election 2024 : पराभूत होणाऱ्या जागा भाजप मित्रपक्षांना देणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com