Ramdas Kadam Targets Uddhav Thackeray : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या विरोधात ऑपरेशन टायगर राबवले. ज्यात त्यांच्या गळाला 6 खासदार लागले असून ते आज(ता.22) शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. एकीकडे या प्रवेशाकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच त्यांचे आमदार देखील फुटतील अशी चर्चा आहे. यामुळे उद्धव ठाकरे अलर्ट मोडवर आले असून त्यांनी आपल्या आमदारांची तातडीने बैठक घेतली आहे. अशावेळी शिवसेना नेते रामदास कदम यांनी ठाकरेंवर अत्यंत टोकदार शब्दांत टीका करत खळबळजनक दावा केला आहे.
रामदास कदम यांनी ऑपरेशन टायगर हे 6 खासदारांसाठी नव्हे तर सात खासदारांसाठी होतं. सातव्या खासदाराचीही पत्रावर सही असून तोही लवकरच फुटणार. आमदारही फुटीच्या मार्गावर असून मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवकही संपर्कात आहेत. आता मी नावं सांगणार नाही. “ये तो झांकी है, और बहोत कुछ बाकी आहे, असे संकेत दिले आहेत. यामुळे आता नव्या चर्चा सुरू झाल्या असून ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा 2022 प्रमाणेच गळती लागणार का असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा होती. ते आज पूर्ण झाले असून ठाकरेंचे खासदार ओमराजे निंबाळकर, नागेश आष्टीकर, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, संजय देशमुख आणि संजय पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. ते आज ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश करत आहेत.
एकीकडे हे सर्व खासदार मुंबईत दाखल झाले असून शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी नंदनवन येथे प्रवेशाची जोरदार तयारी केली जात आहे. अशातच रिष्ठ नेते रामदास कदम यांनी खळबळजनक दावा केला. त्यांनी, ऑपरेशन टायगरमध्ये सहा नाही तर सात खासदारांच्या सह्या असून सातवाही खासदार फुटणार असल्याचा दावा केला आहे. तर या सातही खासदारांच्या सह्यांचे पत्र असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
याचवेळी त्यांनी फक्त खासदारच नाही तर ठाकरेंचे आमदारही आमच्या संपर्कात असून ते ही फुटीच्या मार्गावर असल्याचे म्हटले आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवकही आपच्या संपर्कात असून त्यांची नावे सांगणार नाही, असेही म्हणत ये तो झांकी है, और बहोत कुछ बाकी आहे असा इशारा दिला आहे.
दरम्यान आता एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची नाव समोर आली असून सातवा बंडखोर खासदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे. तर या सातव्या खासदाराला केंद्रीय मंत्रीपद हवं असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
यावेळी रामदार कदम यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली असून उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसणारेच आता त्यांना फसवत आहेत. मी जबाबदारीने बोल आहे, पत्रावर सहा नाही, सातव्या खासदारांच्या सह्या आहेत. सातव्याने मंत्रिपद मागितलं. पण मंत्रिपद मिळत नाही दिसल्यावर ते परतले आणि आता ते उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेत. आता हा कोण ते उद्धव ठाकरेंनीच ओळखावा. पण त्यांना माणसांची ओळख नाही, अशी टीका देखील रामदार कदम यांनी केली आहे.
काही लोकांनी ऑपरेशन टायगर यशस्वी होऊ नये म्हणून प्रयत्न केला. ओमराजे निंबाळकरांना रात्री जाऊन भेटले. मात्र काय झालं उलट निंबाळकरांनी त्यांना चोख उत्तर दिले. तसेच शिंदेंनी देखील कालच सांगितलं की आपण कोणतंही ऑपरेशन अर्थवट करत नाही, असेही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.