Shivsena : पुण्यात शिवसैनिकांमध्ये राडा; आदित्य ठाकरेंनी पाठ फिरताच पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की?

Pune News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पुण्यात पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. मात्र, आदित्य ठाकरे बैठकीवरून निघून जाताच पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून शिवसैनिकांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे.
Shiv Sena (UBT) leader Aaditya Thackeray during a party meeting that reportedly witnessed a clash among office bearers.
Shiv Sena (UBT) leader Aaditya Thackeray during a party meeting that reportedly witnessed a clash among office bearers.sarkarnama
Published on
Updated on

Shivsena Politics : पुण्यातील संकल्प हॉलमध्ये आज शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी तीन लोकसभा मतदारसंघांतील विधानसभा निहाय आढावा घेतला. तसेच पक्षाचे 'बीएलए' आणि पक्ष संघटना वाढीबाबत कार्यकर्त्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.

एकीकडे आदित्य ठाकरे यांनी बैठकीत 'सगळे नेते सोबत' असल्याचा दावा केला असतानाच, ते निघून गेल्यावर मात्र पुणे शिवसेनेतील अंतर्गत कलह समोर आला. आदित्य ठाकरे हॉलमधून बाहेर पडताच काही पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्याचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले.

पुणे महापालिका निवडणुकीच्या वेळी तिकीट नाकारण्यात आल्यामुळे काही स्थानिक पदाधिकारी नाराज होते. त्यांना या अंतर्गत वादाबाबत थेट आदित्य ठाकरेंकडे तक्रार करायची होती. नाराज पदाधिकाऱ्याला आदित्य ठाकरेंना भेटू इच्छित होते, मात्र पक्षातीलच काही वरिष्ठ नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना ठाकरेंपर्यंत पोहोचू दिले नाही.

Shiv Sena (UBT) leader Aaditya Thackeray during a party meeting that reportedly witnessed a clash among office bearers.
Shivsena UBT News : शिवसेनेत प्रवेश करून आमदारकी मिळविणाऱ्या बच्चू कडूंना उद्धव ठाकरेंकडून पहिला दणका; 'प्रहार'ला पाडले खिंडार

यामुळे संबंधित पदाधिकारी प्रचंड संतापले. हा वाद आणि धक्काबुक्की सुरू असतानाच तिथे माध्यमांचे कॅमेरे पोहोचले. माध्यमांचे कॅमेरे समोर दिसताच इतर कार्यकर्त्यांनी तातडीने मध्यस्थी करत चिडलेल्या पदाधिकाऱ्यांची समजूत घातली आणि वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.

Shiv Sena (UBT) leader Aaditya Thackeray during a party meeting that reportedly witnessed a clash among office bearers.
Shivsena UBT : ठाकरेंच्या पक्षात राजकीय भूकंप? जिल्हाप्रमुखाचा कार्यालयात राडा; पंखे-एसी अन् बल्बसुद्धा काढून नेले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com