Shivsena UBT : 'ऑपरेशन टायगर'नंतर ठाकरेंच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर; भास्कर जाधवांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत नार्वेकरांची थेट फडणवीसांकडे मोठी मागणी

Bhaskar Jadhav vs Milind Narvekar : ठाकरेंच्या शिवसेनेतील दोन बड्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. आणि याला उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू नेते मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांची एक्सवरील पोस्ट कारणीभूत ठरली आहे. नार्वेकर यांनी थेट भास्कर जाधवांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वर्धापनदिनीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT Crisis : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 'ऑपरेशन टायगर'मुळे आधीच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे सहा खासदार त्यांना सोडून गेले आहेत. या धक्क्यातून ठाकरे सावरत नाहीत तोच आता त्यांची डोकेदुखी वाढवणारी आणखी एक घटना त्यांच्या पक्षात घडली आहे.

ती म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेतील दोन बड्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. आणि याला उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू नेते मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांची एक्सवरील पोस्ट कारणीभूत ठरली आहे. नार्वेकर यांनी थेट भास्कर जाधवांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वर्धापनदिनीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

ज्यामध्ये जाधव हे "नार्वेकर कोण लागून गेला?" असं म्हणताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करत नार्वेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसजी उद्धवजींच्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा; कारण यांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसत आहे."

Uddhav Thackeray
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ऐतिहासिक निर्णय, 'ते' विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडणार

असं म्हणत नार्वेकरांनी जाधव यांना विरोधी पक्षनेते करण्याबाबत लवकरात लवकर हालचाली करा असं म्हटलं आहे. शिवाय त्यांना विरोधी पक्षनेते न केल्याने भास्कर जाधवांचा मानसिक त्रास आम्हाला सहन करावा लागतोय, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Uddhav Thackeray
Pune Nashik Railway Project : महाराष्ट्राला ब्रेक? संगमनेरवर अन्याय? पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पावर एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराचा संताप

त्यामुळे आता यावर जाधव नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र, आधीच ऑपरेशन टायगर झालं असताना या दोन नेत्यांमधील वाद असा चव्हाट्यावर आल्याने ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे.

व्हिडिओत नेमकं काय?

शिवसेनेच्या वर्धापनदिनी एका वृत्तवाहिनीला षण्मुखानंद सभागृहाबाहेर भास्कर जाधव हे मुलाखत देत होते. त्यावेळी मागून एका गाडीने हॉर्न वाजवत बाजूला होण्याचा इशारा केला. त्यावेळी भास्कर जाधव यांनी गाडीकडे रागाने पाहिले. मुलाखत घेणाऱ्या महिला पत्रकाराने नार्वेकर आहेत, असे जाधव यांना सांगितले. त्यावेळी नार्वेकर कोण लागून गेला? असा संतप्त सवाल जाधव यांनी केला होता. हा व्हिडिओ नार्वेकरांनी आता पोस्ट केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com