Political Tensions Continue in Raigad as Guardian Minister Position; Eknath Shinde And Bharat Gogawale sarkarnama
कोकण

Guardian Minister : ''पलटीमार' तटकरे, रायगडचा पालकमंत्री मीच!' भरत गोगावलेंचा ठाम दावा, महायुतीत पुन्हा खदखद?

Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीतील वाद अद्याप मिटलेला नसल्याचेच आता समोर आले असून खासदार सुनील तटकरेंनी केलेल्या वक्तव्यानं चर्चांना उधान आले आहे.

Aslam Shanedivan

Raigad News : रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद संपता संपत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. नुकताच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांची विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड झाली. यानंतर रायगडचे पालकमंत्री पद शिंदेंच्या शिवसेनेला गेल्याचे तर मंत्री भरत गोगावले यांच्या पालकमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात होते.

मात्र मुलाची बिनविरोध निवड होताच तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्रिपदाबाबत विधान केले. त्यांनी, आम्ही बसून समन्वयाने यावर तोडगा काढू असे म्हटले. यामुळे आता नव्याने रायगडच्या पालकमंत्रिपदावरून वाद सुरू होण्याची शक्यता असून गोगावले यांनी पालकमंत्रिपदावरचा दावा सोडला नसल्याचे सांगितले आहे. तसेच आपणच पालकमंत्री होणार असाही दावा त्यांनी करत आमचं ठरलं आहे असे म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.

कोकणात शिवसेना आणि राष्ट्रवादीत टोकाचा विसंवाद निर्माण झाला असून तो कोकण विधान परिषदेच्या निमित्ताने कमी झाल्याचे चित्र होते. दरम्यान विकास गोगावले आणि अलिबागचे आमदार महेंद्र थोरवे यांची कन्या जुईली दळवी यांच्यामुळे या वादाला थोडी हवा मिळाली होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने गोगावलेंसह दळवींना माघार घेत राष्ट्रवादीची वाट मोकळी करावी लागली.

अशातच भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे यांच्याही शिष्टाईने या निवडणुकीतील महत्वाचा विरोधकाला देखील माघार घ्यावी लागली. महाविकास आघाडीने उमेदवारी दिलेले बाळ माने यांनीही आपला अर्ज मागे घेतला आणि अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली. या वेळी शिवसेनेनं माघार घेण्यामागे रायगडचे पालकमंत्री पदाची सेटलमेंट असल्याची चर्चा होती. आताही राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील नेत्याच्या वक्तव्यावरून अशी डिल झाली होती का अशी चर्चा होताना दिसत आहे.

दरम्यान अनिकेत तटकरे हे बिनविरोध आमदार झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्रिपदाबाबत आम्ही बसून समन्वयाने तोडगा काढू. अशा पद्धतीने चर्चा झालेली नाही. याचा निर्णय तिन्ही पक्षाचे नेते घेतील असे म्हटले होते. ज्यानंतर मुलाची बिनविरोध निवड होताच तटकरेंनी पलटी मारली. तर पालकमंत्रिपदावर राष्ट्रवादीचा दावा कायम असल्याची चर्चा सुरू झाली.

यावर आता गोगावले यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली असून पालकमंत्रिपदाबाबत आमचं ठरलं असून मीच पालकमंत्री होणार यात कोणतंच दुमत नसल्याचे म्हटलं आहे. यावरून गोगावले देखील पालकमंत्रिपदाबाबत आग्रही असल्याचे आता दिसत आहे. तर पुन्हा एकदा पालकमंत्रिपदाबाबतचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.

यावेळी पालकमंत्रिपदाबाबत गोगावले-तटकरे यांच्यातील वाद आता विधान परिषदेतील बिनविरोधानंतर मिटला आहे का? तसे तुम्हाला वाटतं का असा सवाल गोगावले यांना करण्यात आला. यावर गोगावले यांनी, आता तटकरेंच्या मुलाला आम्ही बिनविरोध केलं आहे. यामुळे वाद संपला आहे, तर उरला पालकमंत्रिपदाबाबतचा मुद्दा तोही आता काहीच दिवसात मिटेल. कारण तसं ठरलं आहे. तर १५ ऑगस्ट पूर्वीच याचा निर्णय झाल्यास मीच ध्वजारोहण करेन असेही त्यांनी दावा केला आहे.

दरम्यान याआधी आमदार महेंद्र दळवी यांनी केलेल्या आरोपावर गोगावले यांनी, 'अडीच वर्षांचे मंत्रिपद सोडलं होतं. त्यापुढे पालकमंत्रीपद काय चिज आहे. बोलायला कोणी काही बोलू शकतो, पण वस्तुस्थिती नजरेसमोर ठेवायला पाहिजे ना. वरिष्ठ जेव्हा विचार करून सांगतात तेव्हा आमच्या सारख्या लोकांनी ऐकणं गरजेचं आहे, असे म्हणत विषय संपवला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT