Bharat Gogawale Vs Sunil Tatkare sarkarnama
कोकण

खिल्ली उडवणाऱ्या तटकरेंना गोगावलेंचे आव्हान? नवा प्रस्ताव देत म्हणाले; 'तेथूनच करा तयारी...'

Bharat Gogawale Vs Sunil Tatkare : आगामी पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये पुन्हा एकदा वादाची शक्यता निर्माण झाली आहे.

Aslam Shanedivan

  1. रायगड जिल्ह्यातील महायुतीमध्ये जागा वाटपावरून पुन्हा मतभेद उफाळले असून सुनील तटकरे यांनी भरत गोगावलेंचा प्रस्ताव फेटाळला होता.

  2. भरत गोगावलेंनी ताकद पाहून जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला मांडला आहे, ज्यामुळे महायुतीत तणाव वाढला आहे.

  3. नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता घटक पक्ष कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Raigad News : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. प्रभाग रचनेसह सभापती आणि नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत जाहीर झाली असून आता नगरपंचायती आणि नगरपरीषदा यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर झाला आहे. आता उद्या (सोमवार ता.10) पासून उमेदवारांना अर्ज देखील भरता येणार आहे. यामुळे खऱ्या अर्थाने राजकीय घडामोडींना वेग येणार असून राजकीय रणधुमाळी सुरू होणार आहे. अशातच कोकणात पुन्हा एकदा महायुतीमध्ये वादाची शक्यता निर्माण झाली असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी जागावाटपासाठी नवा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या समोर ठेवला आहे. पण आता तो प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे स्वीकारतात का? हे पाहावे लागणार आहे.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते तथा मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे महायुतीसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यांनी रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 59 जागासाठी प्रस्ताव देताना ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार आहे. तिथे त्या पक्षाने सात जागा लढवाव्या आणि उर्तवरीत तीन जागा या सामोपचाराने वाटून घ्यायच्या असा प्रस्ताव राष्ट्रवादी समोर ठेवला होता.

पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेत ताणलेले संबंध पाहता हा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पचनी पडला नाही. आणि अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला होता. आम्हाला आमची ताकद आणि हक्क माहिती आहेत. त्यामुळे तो आम्ही घेऊनच. या निवडणूकीला आम्ही सामोर जाणार आहोत, युतीचे प्रस्ताव वर्तमानपत्रातून द्यायचे नसतात, त्यासाठी चर्चा होणे गरजेच असते असे म्हणत तटकरेंनी या प्रस्तावाची खिल्ली उडवली होती.

ज्यावर शिवसेनेकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आली नाही. पण आठवड्याच्या आधी तटकरे यांनी पुन्हा एखदा मंत्री गोगावले यांच्या जागा वाटपाच्या फॉम्युल्यावरून खिल्ली उडवली होती. त्यांनी, गोगावले यांच्या फॉम्युल्याचा आगाध ज्ञान असा उल्लेख करत आपण चक्रावून गेलो असल्याचे तटकरे म्हणाले होते. तसेच 2014 पासून आपण जागा वाटपाचे काम करत असून असे सुत्र कधीच कानावर पडलेले नाही. पण आता हे ऐकण्यास मिळाल्याने आपण भांबावून गोलोय असेही ते म्हणाले होते.

या दरम्यान आता नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा झाली असून पुन्हा एकदा मंत्री भरत गोगावले यांनी जागावाटपासाठी नवा प्रस्ताव मांडला आहे. त्यांनी ज्या नगर पालिकेत ज्या पक्षाची ताकद जास्त, त्याला जास्त जागा. ज्याची ताकद कमी त्याला जागा कमी सोडल्या जातील.

जिल्ह्यात जेथे नगरपालिका आहेत. ज्यांची येथे ताकद जास्त त्यांनी आता ठरवावे आणि तेथून सुरूवात करावी असेही आव्हान दिले आहे. आता महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादीकडून याला कसा प्रतिसाद देतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

FAQs :

1. रायगडमध्ये महायुतीमध्ये नेमका वाद कशावरून आहे?
जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात मतभेद झाले आहेत.

2. भरत गोगावलेंनी कोणता प्रस्ताव मांडला आहे?
ज्या नगर पालिकेत पक्षाची ताकद जास्त आहे, त्या पक्षाला जास्त जागा मिळाव्यात, असा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे.

3. सुनील तटकरे यांनी काय भूमिका घेतली आहे?
त्यांनी भरत गोगावलेंचा प्रस्ताव फेटाळत आपला विरोध स्पष्ट केला आहे.

4. महायुतीच्या घटक पक्षांमध्ये आता तणाव वाढेल का?
होय, जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे.

5. या वादाचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
मतभेद कायम राहिल्यास महायुतीची एकजूट कमकुवत होऊन विरोधकांना फायदा होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT