Raigad ZP Election Result 2026; MP Dhairyasheel Patil sarkarnama
कोकण

Raigad ZP result : भाजपचे खासदार धैर्यशील पाटलांना मोठा धक्का; ZP अध्यक्षा राहिलेल्या पत्नी निलिमा पाटील यांचा पराभव

Nilima Dhairyasheel Patil defeated : रायगडमध्ये भाजप खासदारांना धक्का बसला असून थळ गटातून खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी निलिमा पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

सरकारनामा ब्युरो

  • रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला.

  • शिवसेना (शिंदे गट) आणि सुधागड सन्मान समितीच्या शर्मिला बोडके यांनी भाजपच्या नीलिमा पाटील यांचा २,९३१ मतांनी पराभव केला.

  • या निकालामुळे रायगडच्या राजकारणात भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

- अमित गवळे

रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सुधागड तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत आज एक मोठा राजकीय चमत्कार पहायला मिळाला. जांभूळपाडा जिल्हा परिषद गटातून शिवसेना (शिंदे गट) आणि 'सुधागड सन्मान समिती'च्या उमेदवार शर्मिला शरद बोडके यांनी भाजपच्या उमेदवार आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा नीलिमा धैर्यशील पाटील यांचा २,९३१ मतांच्या फरकाने दणदणीत पराभव केला.

सोमवारी (ता. ९) झालेल्या मतमोजणीत शर्मिला बोडके यांनी सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली होती. त्यांना एकूण १०,०६० मते मिळाली, तर भाजपच्या नीलिमा पाटील यांना ७,१२९ मतांवर समाधान मानावे लागले.

निवडणुकीच्या सुरुवातीलाच भाजपने तालुक्याबाहेरील (पेण) उमेदवार नीलिमा पाटील यांना जांभूळपाड्यातून उमेदवारी दिल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट होती. यातूनच 'सुधागड सन्मान समिती' चा जन्म झाला, जिथे शिंदे गट, ठाकरे गट आणि शेकाप यांनी 'स्थानिक अस्मिते'साठी हातमिळवणी केली होती.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख मिलिंद देशमुख आणि तालुकाप्रमुख रवींद्र देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश करून 'सन्मान समिती'ला खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र, मतदारांनी नेत्यांच्या पक्षांतरापेक्षा "सुधागडचा स्वाभिमान" महत्त्वाचा मानत शर्मिला बोडके यांच्या पारड्यात भरभरून मते टाकली. हा विजय तालुक्याच्या आस्मीतेचा, हा विजय तालुका सन्मान समितीचा, समस्त सुधागड वासियांचे हार्दीक आभार. अशा प्रकारचा मेसेज सुधागड तालुक्यातील अनेक ग्रुप वरती फिरत आहे.

विजयाची प्रमुख कारणे :

बाहेरच्या उमेदवाराला विरोध: भाजपने स्थानिक निष्ठावंतांना डावलून खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने मतदारांमध्ये नाराजी होती. सर्वपक्षीय एकजूट: शिंदे गट, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (श. प) आणि शेकापच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी ग्राऊंड लेव्हलला केलेली 'मायक्रो प्लॅनिंग' यशस्वी ठरली.

FAQs :

1. सुधागड जिल्हा परिषद गटातून कोण विजयी झाले?
शिवसेना (शिंदे गट) आणि सुधागड सन्मान समितीच्या शर्मिला शरद बोडके विजयी झाल्या.

2. भाजपच्या कोणत्या नेत्या पराभूत झाल्या?
माजी जिल्हा परिषद अध्यक्षा नीलिमा धैर्यशील पाटील यांचा पराभव झाला.

3. विजयाचे मताधिक्य किती होते?
शर्मिला बोडके यांनी २,९३१ मतांच्या फरकाने विजय मिळवला.

4. हा निकाल राजकीयदृष्ट्या का महत्त्वाचा आहे?
भाजपच्या प्रभावी नेत्या पराभूत झाल्याने रायगड राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

5. या निकालाचा रायगडच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली असून भाजपला आत्मपरीक्षणाची गरज निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT