Sameer Shegde Joins NCP Sarkarnama
कोकण

Shivsena UBT Vs NCP : उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का! 'मशाल' सोडलेल्या शिलेदाराने बांधले अजितदादांचे 'घड्याळ'

Sameer Shegde Joins NCP : मुंबईत माजी नगरसेविकेने उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर रायगडमध्ये देखील ठाकरेंना धक्का बसला आहे. माजी तालुकाध्यक्ष समीर शेडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Roshan More

Raigad Political News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील मुंबई महापालिकेचे माजी नगरसेविका संजना घाडी यांनी रविवारी (ता.13) त्यांचे पती माजी नगरसेवक संजय यांच्यासह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. घाडी यांची चार दिवसांपूर्वी ठाकरेंनी प्रवक्तेपदी नियुक्ती केली होती. हा पहिला धक्का सहन करेपर्यंत रायगडमध्ये ठाकरेंना दुसरा धक्का बसला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजीनामा दिलेले तालुकाध्यक्ष समीर शेडगे यांनी सुनील तटकरेंच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कधी काळी कोकणात एक हाती वर्चस्व असलेल्या ठाकरे बॅकफूटवर आहेत.

सुनील तटकरे यांनी ट्विट करत समीर शेडगे यांचे पक्षात स्वागत केले. ते म्हणाले, रोहा येथे माजी नगराध्यक्ष तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटाचे रोहा तालुका अध्यक्ष समीर शेडगे यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.

प्रदेशाध्यक्ष या नात्याने सर्व नेत्यांचे पक्षात हार्दिक स्वागत करून त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या पक्षप्रवेशामुळे रोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद अधिक वाढणार आहे.

शेडगे तटकरे समर्थकच

समीर शेडगे हे मुळचे तटकरे समर्थक समजले जातात. आठ वर्षांपूर्वी नगराध्यक्षपदाचे उमेदवार न केल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडत शिवसेनेते प्रवेश केला होता. शिवसेनेतील फूटीनंतर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत राहिले होते. मात्र, त्यांनी आता घरवापसीचा निर्णय घेत रोहा येथे सुनील तटकरे, आदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT