
Maharashtra politics caste : भाजप मंत्री मेघना बोर्डीकर यांनी मराठवाड्यातील जातीपातीच्या राजकारणावर घणाघात केला आहे. विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ब्राह्मण जातीवर करण्यात आलेल्या टार्गेटवरून त्यांनी मराठवाड्यातील नेत्यांवर आगपाखड केली आहे.
"संविधान बदलणार, मुस्लिमांना देशाच्या बाहेर काढणार, नागरिकत्व धोक्यात येणार, असे खालच्या पातळीचे घाणेरडे राजकारण करून फडणवीस यांना जातीवरून जशी नावं ठेवली, तसेच माझ्याबाबत देखील झाले", असा घणाघात मंत्री मेघना बोर्डीकर यांनी केला.
भाजप मंत्री मेघना बोर्डीकर बीड जिल्हा दौऱ्यावर असताना, त्यांनी माजलगाव इथल्या कार्यक्रमात हजेरी लावली. मराठवाड्यातील जातीपातीच्या राजकारणावरून त्यांनी जोरदार टीका केली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आमदार प्रकाश सोळुंके यावेळी उपस्थित होते.
मेघना बोर्डीकर यांनी निवडणुकीच्या वेळेस आणि त्या अगोदर, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना ब्राह्मण समाजाचे म्हणून मराठवाड्यात नावे ठेवली गेली. त्याचबरोबर सतत जातीपातीचे राजकारण चालू ठेवले. अनुसूचित जातीच्या लोकांना संविधान बदलणार, मुस्लिमांना देशा बाहेर काढणार, नागरिकत्व धोक्यात येणार, अशी भीती दाखवत मराठवाड्यात अत्यंत जातीपातीचे घाणेरडे राजकारण खेळले गेले. काही मंडळींनी ब्राह्मण समाजाचे देवेंद्र फडणवीस म्हणून त्यांना वेगवेगळ्या प्रकारे नाव ठेवली. तसंच माझ्या बाबती देखील, असेच झाल्या सांगितले.
मेघना बोर्डीकर या आरोग्य मंत्री आहेत. यावेळी त्यांनी राज्यात प्रत्येक भागात गावाच्या पाच ते दहा किलोमीटर अंतरावर आरोग्य यंत्रणेचा जाळ पसरवणार असल्याचे सांगितले. नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. स्त्रियांसाठी वेगळ रुग्णालय देखील उभारणार असल्याचे सांगितले. डायलिसिससाठी सुद्धा प्रत्येक रुग्णालयात सुविधा चालू करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात एक कॅन्सर हॉस्पिटल उभं करणार असल्याची मोठी घोषणा आरोग्य मंत्री मेघना बोर्डीकर यांनी केली.
मागेल त्याला सौर पंप योजना चालू केली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. निजाम कालीन शाळा तोडून नवीन शाळा बांधणार आहोत. मराठवाड्यातील जिल्हा परिषदेची शाळा दर्जेदार हव्यात याच्यासाठी हे काम हाती घेतलं आहे. यासाठी आमदार प्रकाश सोळुंके यांनी देखील पुढाकार घेऊन, भाजप कार्यकर्त्यांनी देखील समन्वय साधून हे काम मार्गी लावावं, असं आवाहन मंत्री बोर्डीकर यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.