शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा (Shiv Sena MLA Disqualification case) काल (10 जानेवारी) निकाल लागला. मात्र, या निकालाचे कवित्व काही संपत नाही. आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यावर टीकेचा आसूड ओढला आहे.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री महोदयांना स्वतः भेटायला जातात त्याच वेळेला एक संशयाची सुई त्यांच्या जाण्याकडे वळलेली होती. ते मुख्यमंत्र्यांना तुम्ही आता अपात्र होणार, मनाची तयारी करा हे सांगायला तरी गेले की तुम्ही अपात्र होत नाहीत म्हणून त्यांचा तोंड गोड करायला गेले, हे नेमके कळत नव्हते, अशी खोचक टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.
परंतु, आता विधानसभा अध्यक्षांच्या निकालावरून कळले की, ते मुख्यमंत्र्यांकडे गेले होते हे त्यांचे तोंड गोड करायला आणि ते तोंड गोड करून तेव्हाच झाले होते. आता फक्त त्याचे वाचन झाले आहे, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.
'हे प्रकरण घडल्यापासून मी नेहमीच सांगतोय की, हा केवळ शिवसेनेमधील (Shiv Sena) अंतर्गत वाद आहे आणि याचा काही बरावाईट परिणाम होईल तो फक्त शिवसेनेवर असं नाही तर संपूर्ण देशातल्या लोकशाहीवर याचा दूरगामी परिणामी होईल. देशात जेवढे पक्ष आहेत त्या सर्व पक्षांवर याचा परिणाम होणार आहे. परंतु आता विधानसभा अध्यक्षांनी एक निर्णय देऊन त्याच्यावर शिक्कामोर्तब केले आहे', अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मी निकालातील काही मुद्दे वाचले की, पक्षप्रतोद राष्ट्रीय कार्यकारिणीने नेमायचा आहे. कोणाला पक्षातून काढायचा असेल तर तो राष्ट्रीय कार्यकारिणीने काढायचा आहे. देशात कितीतरी लहान-मोठे पक्ष आहेत की जे प्रांतिक पक्ष आहेत. त्यांची फक्त नोंदणी आहे पण मान्यता मिळालेली नसते. त्यांना चिन्ह देखील मिळालेले नसते.
मग त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी कुठून आणायची आणि कुठले ठराव करायचे, याचा आपल्याला काही बोध होत नाही. म्हणूनच विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल अनाकलनीय असल्याची टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.
सुप्रीम कोर्टाने निकालात स्पष्ट म्हटले होते की, भरत गोगावले हे व्हीप होऊ शकत नाहीत आणि म्हणून सुप्रीम कोर्टाची कुठेतरी बुज राखायची म्हणून त्यांनी आम्हाला अपात्र ठरवले नाही. अन्यथा त्यांनी आम्हाला नक्कीच अपात्र केले असते, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे.
आम्ही उद्धव ठाकरेंशी प्रामाणिक राहिलो, एकानिष्ठ राहिलो त्यामुळे इथे मात्र आम्हाला शिक्षाच मिळाली असती पण सुप्रीम कोर्टामुळे आमच्यावरचे संकट टळले, असे म्हणावे लागेल, असे भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.