ShivSena MLA Disqualificaiton case : निकालावरून बाहेर झोंबाझोंबी, सभागृहात...

Rahul Narwekar's verdict : गोगावलेंनी हात जोडले, तर सुनील शिंदेंचे मिश्कील हास्य...
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

जुई जाधव

Mumbai Political News :

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल (ShivSena MLA Disqualificaiton case) काल (10 जानेवारी) विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिला. हा संपूर्ण निकाल उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) विरोधात होता. त्यानंतर बाहेर शिंदे गटाकडून जल्लोष, आनंदोत्सव साजरा होत असताना ठाकरे गटाकडून निषेध केला जात होता. मात्र, सभागृहात वेगळेच चित्र पाहायला मिळाले.

खरी शिवसेना (ShivSena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच, असा निकाल विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी दिला. त्यानंतर ठाकरे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया आल्या. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही अध्यक्ष नार्वेकरांवर टीकेचे बाण सोडले. खुद्द उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी नार्वेकरांवर जोरदार तोंडसुख घेतले. त्याचवेळी म्हणजे निकालवाचन होत असताना दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये खेळीमेळीचे वातावरण होते.

Uddhav Thackeray
Shiv Sena MLA Disqualificaiton Verdict : निकाल लागले अन् होर्डिंग्जना वाचा फुटली...

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार दीपक केसरकर, आमदार संजय शिरसाट आणि खासदार राहुल शेवाळे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील आमदार सुनील प्रभू, आमदार सुनील शिंदे, आमदार वैभव नाईक, तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात निकालानंतरही कुठेही कटुता नव्हती. दोन्ही पक्षांतील नेत्यांनी एकमेकांना हसत-खेळत शुभेच्छा दिल्या. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अहो, सुनील शिंदे येता का?

शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचा आहे आणि एकही आमदार अपात्र होणार नसल्याचा निर्णय विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. निकालानंतर एकमेकांसमोर बसलेल्या दोन्ही गटांच्या आमदारांपैकी सुनील शिंदे (Sunil Shinde) यांना शिंदे गटात येण्याचे आमंत्रण उदय सामंत यांनी दिले.

राहुल नार्वेकर यांचा निकाल वाचून झाल्यावर उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांना हाताने इशारा करीत 'आमच्या पक्षात या आता तुम्ही' असे आवतणं दिले. त्यावर सुनील शिंदेंनी मिश्किलपणे हसत पाठ फिरवली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निकाल जरी शिंदेंच्या बाजूने लागल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची निवड चुकीची असून त्यांना एकनाथ शिंदेंना पक्षातून बाहेर काढण्याचा अधिकार नसल्याचे राहुल नार्वेकर यांनी निकालात स्पष्ट केले. एवढेच नाही तर भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून मान्यता देत त्यांना व्हीप अधिकृत ठरवला.

गोगावलेंनी जोडले हात

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गोगावलेंसंदर्भात निकाल देताच भरत गोगावलेंनी (Bharat Gogawale) सुनील प्रभूंना हाक मारली आणि त्यांना हात जोडले. सुनील प्रभू (Sunil Prabhu) बाहेर जायला निघताच भरत गोगावले यांनी त्यांच्या पुढ्यात हात जोडले. त्यावेळी गोगावलेंच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा आनंद दिसत होता.

(Edited by Avinash Chandane)

R...

Uddhav Thackeray
Shiv Sena MLA Disqualification verdict : माजी शिलेदाराचे ठाकरेंवर तोंडसुख; म्हणाले, वारशाने पक्ष...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com