Rajan Salvi Sarkarnama
कोकण

MLA Rajan Salvi Bail Application Rejected : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या अडचणी वाढल्या; रात्रीच घेतली मुंबईकडे धाव...

Roshan More

Ratnagiri : कोकणातील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर रत्नागि री अँटी करप्शन विभागाकडून (एसीबी) गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आमदार राजन साळवी यांनी कोर्टात जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आमदार राजन साळवी शुक्रवारी (ता.2) रात्री उशीरा तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. (MLA Rajan Salvi Bail Application Rejected)

राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या पत्नीचा, मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे शुभम, अनुजा साळवे हे अटकपूर्व जामीन अर्जासाठी राजन साळवी हायकोर्टात जाणार आहेत. यासाठी ते शुक्रवारी रात्री तातडीने मुंबईकडे रवाना झाले. आपल्यावर सुरू असलेली चौकशी ही जाणीवपूर्वक असून आपण ठाकरे गटात निष्ठावंत असल्याने आपल्याला त्रास देण्यासाठीच एसीबीने (ACB) ही कारवाई, चौकशी करण्यात येत आल्याची संतप्त प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर जिल्ह्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. जिल्हा सत्र न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता हाय हायकोर्टाच्या जामीन अर्जावर कोणता निर्णय होतो याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिल आहे.

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा

आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांच्या परिवारातील व्यक्तींवर ऑक्टोबर 2019 ते 2022 या कालावधीमध्ये त्पन्नापेक्षा 118 टक्के संपत्ती जास्त असल्याचा उल्लेख आरोपपत्रामध्ये करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपपत्रात त्यांच्या पत्नी, मुलगा यांच्या नावाचा देखील नावाचा समावेश आहे. त्यामुळे साळवी अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. 18 जानेवारी रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आता न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने साळवी हे हायकोर्टात जाणार आहेत.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT