Konkan News : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर अलीकडेच अँटी करप्शनने कारवाई करत, त्यांच्या घरातील वस्तूंच्या किमतीची यादी केली. यावरून आता राजन साळवी यांनी अँटी करप्शनने वस्तूंच्या यादीमध्ये आपल्याला वंदनीय असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या आसनाचीही दुर्दैवीरित्या किंमत केली आहे, असं सांगत अँटी करप्शनच्या कारवाई वरुन सरकारवर निशाणा साधला. Balasaheb Thackeray Chair
काही दिवसांपूर्वी रत्नागिरी येथील माझ्या राहत्या घरावर अँटी करप्शनने (ACB) धाड टाकली. त्यांनी सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन केले. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे, ज्या आसनावर बसून हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांनी शिवसेना भवन दादर येथून शिवसेना चालवली, वाढवली, त्या आसनाची किंमत ठरवली. आज जे राज्यकर्ते झाले आहेत, त्यांनाही नावारूपाला बाळासाहेबांनीच आणले. आज त्यांच्याच आदेशाने त्या माझा घरातील शिवसेनाप्रमुखांच्या आसनांची किंमत ठरवली जावी, हे दुर्दैवी आहे, अशा शब्दात राजन साळवी यांनी उद्विग्नता व्यक्त करत, सरकारवर निशाणा साधला. (Shiv Sena chief Balasaheb Thackeray Chair for 10 thousand rupees)
"हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांनी शिवसेना भवन, दादर येथे बसून शिवसेना महाराष्ट्रभर तळागाळापर्यंत रुजवली. तेच आसन मी हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण म्हणून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ह्यांच्या परवानगीने माझा निवासस्थानी नित्यपूजेसाठी आणले. त्यावेळी माझा चिरंजीव अथर्व ह्याने हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या वरील निष्ठेने एक त्यांचे सुंदर चित्र रेखाटले. माझी पत्नी अनुजा व मी त्या आसनांची नित्यनेमाने पूजा करतो. परंतु दुर्दैवाची बाब रत्नागिरी येथील माझ्या राहत्या घरावर अँटी करप्शनने (ACB) धाड टाकली. व त्या पूजनीय आसनाची व फोटोची मी शिवसैनिक म्हणून अनमोल समजतो, त्याची किंमत ठरवली. हे खूप दुर्दैवी आहे, असं सांगत या सगळ्या वस्तूंची यादीच राजन साळवी यांनी सोशल मीडियावरती जाहीर केले आहे. या वस्तूंच्या यादीमध्ये या बाळासाहेबांच्या आसनाचा समावेश आहे.
अलीकडेच काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांच्या घरी अँटी करप्शनने धडक कारवाई करत, त्यांची पत्नी व मुलगा व भाऊ यांनाही चौकशीसाठी बोलावलं होतं. या सगळ्या प्रकरणात अप-संपत्ती जमा केल्याप्रकरणी आमदार राजन साळवी यांच्यावर अँटी करप्शन कडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.