Sunil Tatkare and Bharat Gogawale Sarakrnama
कोकण

Tatkare and Gogawale : सुनील तटकरे आणि भरत गोगावलेंमधील वितुष्ट संपले!

NCP-Shivsena : पोलादपूर तालुक्यातील भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्त आले एकाच मंचावर

सरकारनामा ब्युरो

Raigad District Politics News : कोकणातील रायगड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्यातील राजकीय वितुष्ट जुने आहे. गोगावले यांनी तटकरे यांच्यावरती टीका करण्याची एकही संधी राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यानंतरही सोडली नव्हती. इतकेच नाहीतर आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद देण्यास गोगवले यांनी जाहीरपणे विरोध केला होता.

म्हणून आजपर्यंत रायगडच्या पालकमंत्री पदाची धुराही उदय सामंत यांच्याकडेच आहे. अलीकडेच रायगड जिल्हयात गोरेगाव लोणेरे येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमानंतर तटकरे व गोगावले यांच्यातील वाद शमल्याचे पाहायला मिळत आहे. पोलादपूर तालुक्यात झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमालाही ते दोघे एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळालं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यातील महायुतीचा संदेश जिल्ह्यातील प्रत्येक गावात, घरामध्ये पोहोचवा म्हणजे आज रायगड जिल्ह्यातील दोन खासदार अन् सातही आमदार महायुतीचे शंभर टक्के आहेत ते आगामी लोकसभा निवडणुकीमध्येही राहतील, असा विश्वास खासदार सुनील तटकरे(Sunil Tatkare) यांनी व्यक्त केला. पोलादपूर तालुक्यातील लोहारे येथे पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या तीन रस्त्यांचे भुमिपूजन तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले तेव्हा ते बोलत होते.

तर शिवसेना पक्षप्रतोद व महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितले की, विरोधकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते. ते काय सावित्री नदीतूनवर येऊ दिले नाही आणि देणारपण नाही. आमदार म्हणून आम्ही जबाबदारी पार पाडत असतो तर खासदार म्हणून तटकरे त्यांची भूमिका पार पाडत असतात. लोहारेचा पूल मंत्रिपदाच्या माध्यमातून तटकरेंनी केला त्यावेळी आपण आमदार होतो, अशी आठवण सांगून खासदार सुनील तटकरे यांच्या कामाचे कौतुक करत आता एकप्रकरे त्यांनी राजकीय वितुष्ट संपल्याचेच जाहीर संकेत दिले आहेत.

गोगावले पुढे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीसाठी दीड महिना राहिला आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र असताना विरोधकांना उमेदवारीची इच्छा राहील की नाही, याबाबत साशंकता वाटत आहे. उसनं अवसान आणून सरकार कोसळेल भरत गोगावले(Bharat Gogawale) अपात्र ठरेल अशा वल्गना करणाऱ्यांच्या अपेक्षा नार्वेकरांच्या निर्णयामुळे धुळीस मिळाल्या आहेत.

याचबरोबर भरत गोगावले यांनी श्रीराममंदिराच्या शुभारंभावेळी गावागावातील मंदिरांवर रोषणाई करा, महायुतीसरकारचे जनहिताचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा, महायुती झाली असल्याने तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे रुसवेफुगवे दूर करून सर्वांना एकत्र करून प्रचाराला लागा, असे सांगत आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याचे सूतोवाच केल आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT