Shrikant Shinde Minister Sarkarnama
कोकण

Shrikant Shinde Minister : श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्रीपद! सुनील तटकरेंकडून शिवसेना अन् एकनाथ शिंदेंच्या वाढलेल्या ताकदीची स्तुस्ती

Sunil Tatkare says NDA leadership will decide Shrikant Shinde ministerial future : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग; श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा सुरू असताना सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Pradeep Pendhare

Modi Cabinet Expansion : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना शिक्षणमंत्री पदावर संधी मिळेल, अशा चर्चा सुरू आहेत.

यावर अजित पवार राष्ट्रवादीचे खासदार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी, काय निर्णय घ्यायचा तो, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री अमित शाह आणि एनडीए महायुतीत होईल, असे सांगून चर्चेचा चेंडू टोलावून लावला.

सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले, "एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना महाराष्ट्रात दमदार कामगिरी करत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे सहा खासदार विलीन झाले. एकनाथ शिंदे यांनी, त्यांची ताकद लोकशाहीच्या माध्यमातून सिद्ध केली."

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तार होत असतो. त्या संदर्भाचा निर्णय एनडीएचे नेतृत्व घेते. NDA मध्ये नेमकी किती जागा शिवसेना द्यायची, कोणत्या पक्षाला द्यायच्या, हा त्यांचा अधिकार आहे. शिवसेनेच्या (Shivsena) वाट्याला जागा आल्यानंतर कोणाला मंत्रि‍पदावर विराजमान करायचा हा एकनाथ शिंदे यांचा अधिकार आहे, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रात मंत्री होणार असल्याच्या चर्चांवर, त्यांना काल दिल्लीत बोलावून घेतले होते. सहाजिकच पक्ष आणि केंद्रातील नेतृत्वाची काही चर्चा झाल्या असतील. परंतु ही भेट नेमकी कोणत्या संदर्भात होती, याची कल्पना नाही, असे सांगून सुनील तटकरे यांनी त्यावर अधिक भाष्य केले नाही.

अजित पवार राष्ट्रवादीच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे संकेत दिल्याची चर्चा आहे. यावर बोलताना तटकरे यांनी, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत यापूर्वीच शरद पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मत व्यक्त केले आहे. परंतु राजकारणामध्ये सध्या दोन्ही राष्ट्रवादीची विलीनीकरणाची कोणताही चर्चा नाही. योग्यवेळी तशा प्रकारची चर्चा सुरू झाली, तर त्यावेळेस विचार होईल. परंतु आता विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणे बंद आहे, हे तटकरेंनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT