

Student Protest Video : दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर गाझियाबादमधील एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन विद्यार्थी आंदोलकांना एका व्यक्तीने अडवून त्यांच्याशी वाद घातल्याचा आणि धमकी दिल्याचा दावा केला जात आहे.
या व्हिडिओवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा आमदार जितेंद्र आव्हाड आणि कॉक्रोच जनता पक्ष (CJP) उपहासात्मक आंदोलकांनी भाजपवर टीका केली आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यांच्या 'एक्स' (X) खात्यावर हा व्हिडिओ शेअर करत संबंधित घटनेचा उल्लेख केला आहे. त्यांच्या पोस्टनुसार, घराकडे परतणाऱ्या दोन विद्यार्थी आंदोलकांना गाझियाबादमध्ये एका स्थानिक कार्यकर्त्याने अडवून आंदोलनात सहभागी होण्याबाबत जाब विचारला. या कार्यकर्त्याच्या गळ्यात भगवा पंचा आहे. विद्यार्थ्यांची ओळख, धर्म आणि शिक्षणाबाबत प्रश्न विचारत त्यांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती विद्यार्थ्यांना (Student) आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल प्रश्न विचारताना दिसत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. तसेच भविष्यात अशा आंदोलनात सहभागी झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचाही आरोप पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान, कॉक्रोच जनता पक्षानेही हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत भाजपवर टीका केली आहे. पक्षाने आपल्या पोस्टमध्ये भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, "हुकूमशाहीची वृत्ती सोडावी, अन्यथा 2029 मध्ये जनतेचा रोष सहन करावा लागू शकतो," असा इशारा दिला आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, व्हिडिओतील घटनांबाबत किंवा त्यामधील दाव्यांबाबत संबंधित प्रशासन अथवा पोलिसांकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. तसेच संबंधित व्यक्ती किंवा भाजपकडूनही या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.