Ratnagiri, 26 December : महायुतीमध्ये पालकमंत्रिपदावरून कोणताही वाद नाही. पालकमंत्रिपदाचे शंभर टक्के वाटप पूर्ण झालेले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील सर्व पालकमंत्री जाहीर होतील, असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरीत माध्यमांशी बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत (Uday samant) यांनी पालकमंत्रिपदाबाबत सध्या सुरू असलेल्या चर्चेवर पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, पालकमंत्रिपदावरून कोणत्याही स्वरूपाचा वाद महायुतीमध्ये नाही. तुम्हाला नवीन वर्षाच्या सुरुवातीला काही तरी ब्रेकिंग पाहिजे म्हणून पालकमंत्रिपदाबाबत सस्पेन्स ठेवण्यात आलेला आहे. पालकमंत्रिपदांचे तीनही पक्षांत वाटप झालेले आहे.
येत्या दोन ते तीन दिवसांत महायुती सरकारडून पालकमंत्रिपदाचे वाटप होईल, कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री (Guardian Minister) आहेत, हे कळणार आहे, हे सांगताना रत्नागिरीचे पालकमंत्रिपद पुन्हा एकदा शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याकडे येईल, असे स्पष्ट संकेतही उद्योगमंत्र्यांनी दिले.
माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे मला ज्येष्ठ आहेत. ते जे काही बोलेले आहेत, ते मी ऐकले नाही. त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्यावर मी माझी विद्ववता व्यक्त करावी, हे मला योग्य वाटत नाही. तसेच, त्यांच्या नाराजीबाबत मला काहीही माहिती नाही, असेही उदय सामंतांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला आमचे केंद्रीय मंत्री प्रताप जाधव हे उपस्थित होते. मात्र, एकनाथ शिंदे नाराज आहोत, त्यामुळे ते एनडीएच्या बैठकीला गेले नाहीत, हे सर्व खोटे आहे. शिंदे हे नाराज असते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलेच नसते. केंद्रात जाधव हे आमचे नेतृत्व करत आहेत, त्यामुळे एनडीएच्या बैठकीला जाधव गेले म्हणजे शिवसेना गेल्यासारखी आहे, असे स्पष्टीकरणही उदय सामंत यांनी दिले.
आरोग्य मंत्रालयाबाबत गौप्यस्फोट
माझ्याकडे आरोग्य मंत्रालय येणार, अशा बातम्या पंधरा दिवसांपूर्वी आल्या होत्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला त्याबाबत विचारलेही होते, ‘ज्या पद्धतीने आपण उद्योग विभाग चालवला, त्याच पद्धतीने राज्याचा आरोग्य विभाग चालवावा,’ अशी सूचनाही त्यांनी मला केली होती.
मी कधीही असं म्हटलं नव्हतं की, मला उद्योग खातंच पाहिजे. उलट मी एकनाथ शिंदे यांना सांगितले की, सर्वसामान्य माणसाचं आरोग्य सुधारण्याची जबाबदारी माझ्यावर येणार असेल तर आरोग्य मंत्रिपद मी हसत हसत स्वीकारेन. पण तो राजकारणाचा एक भाग आहे, आरोग्य मंत्रालय माझ्याकडे आलं नाही. पुन्हा एकदा माझ्याकडे उद्योग विभाग आला, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.