Uddhav Thackeray News | Raigad Political News Sarkarnama
कोकण

Uddhav Thackeray News : 'शूरवीर-निष्ठावंतांच्या रायगडावर गद्दारांसाठी टकमक टोक'; ठाकरेंनी घेतला समाचार!

Chetan Zadpe

Raigad News : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांची पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन या ठिकाणी सभा सुरू आहेत. पोलादपूर येथील सभेत ठाकरेंनी सरकारच्या कारभारावर टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पक्षप्रतोद आणि स्थानिक आमदार भरत गोगावले यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. गेल्या अनेक दिवस मिळत नसलेल्या मंत्रीपदावरून गोगावलेंना ठाकरेंनी डिवचले आहे. (Latest Marathi News)

'आज मंत्री होणार, उद्या मंत्री होणार, परवा मंत्री होणार, अशा स्वप्नातल्या पालकमंत्र्य़ांन नवीन जॅकेट शिवलं, ते जॅकेट जुनं झालं. नवनवीन नॅपकिन घेतले, तेही घामाने भिजले. पण मंत्रीपद काही मिळतच नाही, अशा शब्दात महाडचे आमदार भरत गोगवले यांचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. या रायगडमध्ये शूरवीर जन्माला आले, निष्ठावंत जन्माला आले, त्याच रायगड जिल्ह्यामध्ये रायगड किल्ल्यावरती गद्दारांना टकमक टोक दाखवणारा रायगड किल्लाही याच जिल्ह्यात आहे, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"हा जनसंवाद नाही, तर मी माझ्या कुटुंबाच्या जवळ हा संवाद साधतोय. हे सगळं माझं कुटुंब आहे. कोरोना कालावधीत माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम मी या सगळ्या आपल्या कुटुंबासाठी राबवली होती. काही जणांना यावरूनसुद्धा पोट दुखी आहे. तुम्ही सगळे मला महाराष्ट्रातील जनता आपल्या कुटुंबातील सदस्य मानता, तर काही जणांना दारोदारी जाऊन सुद्धा सगळे म्हणतात 'हड' म्हणतात, अशी त्यांनी विरोधकांची खिल्ली उडवत, 'सरकार आपल्या दारी, लोक सांगतात जा तुझ्या घरी' अशा शब्दात ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील सभेत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे

"रायगडचं वार असं फिरलं नाही तर रायगडाच्या वाऱ्याने मोठमोठे सरकारला झोपवल आहे. दिल्लीला आग्र्याला झुकवणारा हा रायगड आहे, असा शब्दात रायगडच कौतुक करत ही भूमी नरवीरांची तानाजी मालुसरेंची आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही भगवा फडकवणारच. पण या भूमीत आता झेंडा राहिला बाजूला आणि नॅपकिन फडकवणारेच खूप झाले, असे शब्दात आमदार भरत गोगावले यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे.

'इकडे वारकरी संप्रदाय आहे पण यावरून मला बाळासाहेबांनी सांगितलेले एक वाक्य आठवलं की आम्ही सुद्धा वारकरी आहोत आम्ही अन्यायावरती वार करणारे वारकरी त्याच्यामुळे आपला पंथ एकच झेंडा एकच धर्म एकच आहे जो भगवा आपल्या छत्रपतींचा हिंदूंचा आहे त्या भगव्यामध्ये छेद करणारे व हिंदुत्वमध्ये मध्ये भेद करणारे भारतीय जनता पक्षाचे गोमूत्रधारी हिंदू आले आहेत त्यांना आता त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे,' असेही आवाहन उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील सभेत केल आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT