Aditi Tatkare and Bharat Gogawale: रायगडचं पालकमंत्रिपद अदिती तटकरेंना मिळू नये म्हणून झटणारे गोगावले अचानक झाले शांत!

Raigad District Guardian Minister Post : भरत गोगावलेंच्या नेतृत्वात आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही घेतली होती भेट
Aditi Tatkare and Bharat Gogawle
Aditi Tatkare and Bharat GogawleSarkarnama
Published on
Updated on

Raigad District News : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या मंत्री अदिती तटकरे या सत्तेत सहभागी झाल्यावर त्यांना रायगडचे पालकमंत्रिपद मिळू नये म्हणून त्यांचा विरोधात आक्रमक असलेले शिवसेना शिंदे गटाच्या रायगड जिल्हयातील आमदारांनी भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला मोठा विरोध केला होता. पण हा विरोध आता मावळला असून आता जुळवून घेतल्याचे चित्र आहे. पण या विरोधामुळे रायगडचे पालकमंत्रीपद अद्याप प्रभारी असून ते शिवसेनेच्या उदय सामंत यांच्याकडे आहे.

रायगड जिल्हयात शिवसेना व राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हा वाद जुना होता. सत्तेत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या कार्यकाळात केवळ राष्ट्रवादीलाच निधी मिळत होता अदिती तटकरे निधी देत नाहीत असा आरोप सातत्याने झाला होता.राज्यात झालेल्या दुसर्‍या राजकीय भूकंपानंतर अजितदादांचा राष्ट्रवादी गटही सत्तेत सहभागी झाला, तटकरेही महायुतीत सत्तेत सहभागी झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Aditi Tatkare and Bharat Gogawle
Raigad Lok Sabha Constituency : अनंत गीतेंना रायगडमधून पुन्हा लोकसभेत जाण्याची संधी!

पण यानंतरही हा विरोध कायम होता, महाडाचे आमदार गोगावले याना मंत्रिपद न मिळाल्याने नाराज होते. तर गोगावले यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग आमदार महेंद्र दळवी, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे या सगळ्या शिवसेनेच्या आमदारांनी आदिती तटकरे यांना असलेला विरोध मुख्यमंत्र्यांना भेटून नोंदवला होता.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आगामी येऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन आपापसातील राजकीय मतभेद मिटवले आहेत. अलीकडेच भरत गोगावले(Bharat Gogawale) व सुनील तटकरे यांनी पोलादपूरमध्ये एकत्र येत एकमेकांच्या कामाचे कौतुक करत आम्ही एकत्र आल्याचे स्पष्ट संकेत दिले. माणगाव येथे एका कार्यक्रमात महायुतीतील मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हे तीनही नेते एकत्र आले त्यानंतर तटकरे व शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार यांच्यातील वाद मिटले आहेत.

Aditi Tatkare and Bharat Gogawle
Ratnagiri News : मतदारजागृतीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याची बाजी; जिल्हाधिकाऱ्यांना...

मंत्री अदिती तटकरे यांच्याकडूनही शिवसेनेच्या आमदारांना विकासनिधी देण्यात प्राधान्य मिळत आहे. त्यामुळे आता खासदार सुनील तटकरे(Aditi Tatkare) व मंत्री अदिती तटकरे यांना शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचा आमदारांचा असलेल्या विरोधाच्या तलवारी म्यान झाल्या आहेत.

(Edited by- Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com