Uddhav Thackeray Sarkarnama
कोकण

Uddhav Thackeray : निवडणुकीच्या मैदानात बॅट, बॉल, अंपयारही भाजपचाच; ठाकरेंनी संगळंच सांगितलं

Sunil Balasaheb Dhumal

Konkan Sindhudurg News : भाजप 'अबकी बार 400 पार' अशी घोषणा देते, ते कशाच्या जीवावर? मैदान यांचेच, बॅट,बॉलसह अंपायरही त्यांचेच. आऊट झाले तरी सिक्सर देणार. या नंपुसक म्हणता. तुमच्या थोडी मर्दुमकी शिल्लक असेल, तर घरगडी असलेले सीबीआय, ईडी, पोलिस बाजूला करा अन् मैदानात या, असे ओपन चॅलेंज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला दिले आहे.

सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असलेल्या ठाकरेंनी (Uddhav Thackeray) कणकवलीतील सभेत भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कडक शब्दात समाचार घेतला. ठाकरे म्हणाले, ज्या वेळी कुणी जवळ करत नव्हते, त्यावेळी अटलजींच्या नेतृत्वातील भाजपला बाळासाहेबांनी खांद्यावर घेतले. त्यांनी पाठिंबा दिला नसता तर अटल बिहारी वाजपेयींनी तुम्हाला कधीच केराच्या टोपलीत टाकले असते, असे म्हणत ठाकरेंनी मोदींना लक्ष्य केले.

मोदींना (Narendra Modi) हल्ली सारखे महाराष्ट्रात यावसे वाटते. संकटकाळात कधी येत नाहीत पण आता गेल्या आठवड्यात आले होते. ते आले की राज्यातील जे चांगले आहे ते गुजरातला घेऊनच जातात. गेल्या वेळी त्यांनी कोकणात येणारा पाणबुडीचा प्रकल्पच नेला. त्यामुळे मोदी यायचे म्हटले तरी मला भिती वाटते, असा टोलाही ठाकरेंनी लगावला.

देशात भाजपला कुणी जवळ करत नव्हते. त्यावेळी बाळासाहेबांनी भाजपला जवळ केले. त्यावेळी बाळासाहेबांनी तुम्हाला खांद्यावर घेतले. तसे केले नसते तर अटबिहारी वाजपेयांनी त्यांना उचलून केराच्या टोपलीत टाकले असते, असा चिमटाही ठाकरेंनी घेतला.

भाजपला बाळासाहेबांनी दिलेल्या आधाराचा विसर पडला आहे. ते माझे राजकारण संपवण्याची बाता करतात. शिवसेना मला वारसाहक्काने मिळालेली आहे. ही लोकशाही आहे, तरी तुम्ही हुकूशाहीसारखे वागता. तुम्ही मर्द असाल तर घरगडी बाजूला ठेवून या अंगावर. असे थेट चॅलेंजच ठाकरेंनी भाजपसह केंद्रीय नेत्यांना दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे म्हणाले, मर्दपणा अंगात असावा लागतो, तो ५० खोक्यांनी विकत घेता येत आहे. तुमच्यात मर्दुमकी शिल्लक तर एकटे अंगावर या. स्वतःला विश्वगुरू म्हणवून घेता. जगात सर्वात मोठा पक्ष आहे म्हणता, तरी तुम्हाला फोडाफोडी करावी लागते. नितेश कुमारांना फोडले. हेमंत सोरेन यांना तुरुगांत टाकले. अरविंद केजरीवालांच्या मागे ससेमिरा लावला. शिवसेना नावही चोरले. हीच का तुमची मर्दुमकी? बाळासाहेबांनी दिलेली साथ विसरून त्यांच्या मुलाला म्हणजे मला राजकारणातून संपवण्याची वाल्गना करू लागले. चला या अंगावर, उद्या सत्ता जाऊद्या, मग हीच सत्ता तुमच्या अंगावर कशी येते ते पाहा, असा इशाराच ठाकरेंनी भाजपनेतृत्वाला दिला आहे.

राज्याची ओळख बदलतेय?

कणखर देशा, दगडांच्या देशा अशी महाराष्ट्राची ओळख आहे. आज मात्र लाचारांच्या, गुंडांच्या देशा अशी झाल्याचे दिसत आहे. शिवरायांनी शिकवले की दिल्लीपुढे झुकायचे नाही. गुजरातवर संकटे आली त्यावेळी शिवसेना धावून गेली. मात्र आता राज्यातील चांगले प्रकल्प पळवून नेले जातात. असे असतानाही शिंदे सरकार शांत बसते. आपल्या कणखर, दगडांच्या देशा हीच राज्याची ओळख ठेवायची आहे. त्यासाठी तुम्हाला गाडल्याशिवाय शांत बसणार नाही, असा थेट इशारा ठाकरेंनी दिला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT