Lok Sabha Election 2024 : प्रकाश आंबेडकरांची महाविकास आघाडीतील एन्ट्री परभणीत किती फायद्याची ?

Parbhani VBA and Mahavikas Aghadi: शिवसेना ठाकरे गटासोबत युती जाहीर केल्यानंतर वंचित बहुजन आघाडी अखेर महाविकास आघाडीत सहभागी झाली.
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSarkarnama
Published on
Updated on

Parbhani News: लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पक्षांची जुळवाजुळव करण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. प्रादेशिक पक्ष जागावाटपात अधिकाधिक पदरात पाडून घेण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करत आहेत. प्रमुख पक्षांकडून नाराजांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी जागावाटपाचा अतिशय जटील असणारा प्रश्न सोडवण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु आहे. (Lok Sabha Election 2024)

शिवसेना ठाकरे गटासोबत युती जाहीर केलेल्या वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश निश्चित झाला आणि कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण झाला आहे. 2019 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने अस्तित्व सिद्ध केले होते. ओवैसी बंधूंचा एमआयएम पक्ष वंचित बहुजन आघाडीत सहभागी झाला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahavikas Aghadi
Ambadas Danve News : मराठा-ओबीसी वादात सरकारची भूमिका मी मारल्या सारखं करतो, तू....

परभणी, हिंगोली, नांदेड लोकसभा मतदारसंघात आघाडीच्या मतांनी थेट निवडणूक निकालावर परिणाम केला. छत्रपती संभाजीनगर येथे तर आघाडीचा उमेदवाराचा विजय झाला. दलित मुस्लीम मतदार ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पारंपारिक वोटबँक मानली जाते. मात्र दलित मुस्लीम मतदार वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने उभे राहिल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवाराना मोठा फटका बसला. यामुळे वंचित बहुजन आघाडीवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप झाला.

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. यामुळे भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येण्याचा प्रयत्न शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी केला आहे. भाजपच्या धोरणाचा नेहमी उघडपणे विरोध करणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत सोबत असावेत यासाठी विशेष प्रयत्न केले गेले.

वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत येण्यापूर्वीच शिवसेना (ठाकरे गट) पक्षासोबत युती जाहीर केली आहे. त्यानंतर प्रश्न होता महाविकास आघाडीत येण्याचा. अखेर महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांची बैठक होऊन त्यात वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला. काँग्रेस, राष्ट्र्वादी काँग्रेस (शरद पवार गट) हे पुरोगामी विचारधारेला मानणारे पक्ष आहेत.

तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आपल्या भाषणातून भाजपच्या विचारधारेला तीव्र शब्दात विरोध करत आहेत. यामुळे समविचारी पक्षासोबत आघाडी झाल्याने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह दिसून येत आहे. आता आंबेडकरांची महाविकास आघाडीतील एन्ट्री परभणी लोकसभा मतदारसंघात आघाडीसाठी किती फायद्याची ठरते हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

(Edited By-Ganesh Thombare)

Mahavikas Aghadi
Lok Sabha Election 2024 : जानकरांचे मिशन परभणी; महाविकास आघाडी अन् महायुतीला टेन्शन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com