Uddhav Thackeray  Sarkarnama
कोकण

Uddhav Thackeray On Modi Guarantee : उद्धव ठाकरेंनी सांगितला मोदी गॅरंटींचा अर्थ, म्हणाले...

Narendra Modi : . 400 पार करण्याच्या घोषणा भाजप करत आहे. मग तुम्हाला नितीशकुमारांची गरज का पडते आहे, असा थेट सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.

Roshan More

Politoical News : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणांमधून वारंवार 'मोदी गॅरंटी'चा उल्लेख करत आहेत. या गॅरंटीच्या आधाराचे पंतप्रधान मोदी यांनी पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूक जिंकली. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आपल्या प्रत्येक भाषणात 'मोदी गॅरंटी'चा उल्लेख करत आहेत. आपण दिलेला शब्द पाळतो, असे पंतप्रधान मोदी गॅरंटीच्या माध्यमातून सांगत आहेत. पण, इंडिया आघाडीतून एनडीएमध्ये गेलेल्या नितीशकुमार यांचा आधार घेत उद्धव ठाकरे यांनी 'मोदी गॅरंटी'चा अर्थ सांगितला आहे.

भ्रष्टाचार करा. भाजपात या तुम्हाला क्लीन चीट दिली जाईल. क्लीन चीटची गॅरंटी म्हणजे मोदी गॅरंटी, असा घणाघात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. अजित पवार (Ajit Pawar) यांना क्लीन चीट दिली जाते. ज्यावेळी नितीशकुमार एनडीएसोबत जात होते. त्यावेळी तेजस्वी यादव यांची ईडीकडून चौकशी केली जात होती. 400 पार करण्याच्या घोषणा भाजप करत आहे. मग तुम्हाला नितीशकुमारांची गरज का पडते आहे, असा थेट सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. (Uddhav Thackeray On Modi Guarantee )

पंतप्रधानपदाचे स्वप्न पडत नाही

माजी खासदार आनंद गीते यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून केला. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले मी तर पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहत होतो. तुम्ही माझा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून केला. त्यानंतर हसत ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री होण्याचा कधी विचार केला नव्हता. आणि आत्ता देखील पंतप्रधान होण्याचे स्वप्न मला स्वप्नात पडत नाही. कोकणावर जेव्हा संकट आले होते तेव्हा मोदी कोकणात आले होते का? दोन वादळे कोकणात आली. येथील घरे उद्धवस्थ झाली. मात्र, मोदी आले नाहीत, असे ठाकरे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बजेटमधून टोपी घातली

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (गुरुवारी) संसदेत बजेट मांडले. या बजेटमधून सर्वसामान्यांना दिलास दिला असल्याचा दावा भाजप करत आहेत. मात्र, बजेटवरून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारमण यांच्यावर टीका केली आहे. या बजेटमधून सर्वसामान्यांना टोपी घातली असल्याचे, ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT