Vaibhav Naik  sarkarnama
कोकण

Vaibhav Naik : प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी ठाकरेंचे आमदार लागले कामाला; मालवणमध्ये वैभव नाईक...

Shiv Sena News : शिवसैनिकांच्या त्यागाला श्रद्धांजली वाहण्यासाठी मालवणात शिवसेना ठाकरे गटाकडून राम मंदिर निर्माण सोहळा साजरा केला जाणार आहे.

Roshan More

Sindhudurg : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्याला उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार नाहीत. मात्र, त्यांच्या पक्षाकडून प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी विविध कार्यक्रम घेण्याची तयारी केली आहे. त्यासाठी ठाकरे गटातील आमदार कामाला लागले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

राम मंदिरासाठी अनेक शिवसैनिकांनी हौतात्म्य पत्करले आहे. या शिवसैनिकांच्या त्यागाला श्रद्धांजली वाहण्यासाठी मालवणात शिवसेना ठाकरे गटाकडून राम मंदिर निर्माण सोहळा साजरा केला जाणार आहे. आज (गुरुवारी) राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमदार वैभव नाईक (*Vaibhav Naik) यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील राम मंदिरात महाआरती, महाप्रसादासह मोटारसायकल रॅली काढली जाणार आहे, असे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर आणि शहरप्रमुख बाबी जोगी यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

18 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता शिवसेना शाखा ते बाजारपेठ फोवकांडा पिंपळ मार्गे भरड नाका मार्गे राम मंदिर पर्यंत बाईक रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी 2 वाजता राम मंदिरात महाआरती आणि महाप्रसाद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, 17 ते 20 जानेवारी या कालावधीत रामायण या विषयावर चित्रकला स्पर्धा होणार असून विविध वयोगटातील स्पर्धकांन आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

शिवसैनिक लागले कामाला

लोकसभा निवडणुकीसाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवसैनिका कामाला लागले असल्याचा संदेश देण्यात येत आहे. खरा शिवसैनिक हा ठाकरेंसोबत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित होईल, असा विश्वास शहरातील शिवसैनिक व्यक्त करत आहेत.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT