Vaibhav Naik News : पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेणे ही तर महाराष्ट्राशी गद्दारी..!

Sindhudurg Submarine Project : आमदार वैभव नाईक यांची केंद्र व राज्य सरकारवर टीका.
Vaibhav Naik
Vaibhav NaikSarkarnama
Published on
Updated on

Vaibhav Naik News : महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर टीका करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेला पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आता विरोधकांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार व भाजपवर निशाणा साधला आहे.

मंजूर झालेला पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेणे म्हणजे महाराष्ट्राशी गद्दारी असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केली आहे. चांगले प्रकल्प गुजरातला नेण्याचा हा भाजप (BJP) चा मोठा डाव असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या मंजुरी बद्दलची माहिती दिली आहे.

Vaibhav Naik
CM Shidne : 'आधी कामगारांची थकबाकी द्या मगच क्लस्टरचे काम' ; भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा!

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील निवती किनारी येथे होणाऱ्या या प्रकल्पासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना बजेटमध्ये तरतूद करण्यात आली होती. 2018 साली हा प्रकल्प मंजूर झाला होता महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून हा प्रकल्प आणण्यात आला होता. त्यावेळीच अर्थसंकल्पीय भाषणात सुद्धा याचा उल्लेख झाला होता अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर असताना त्यांच्याकडून ही तरतूद करून घेण्यात आली होती.

त्यावेळी या प्रकल्पासाठी पाणबुडी ऑर्डर सुद्धा देण्यात आली होती. जवळपास 150 ते 200 कोटी रुपयांची पाणबुडीची ऑर्डर त्यावेळेस प्राथमिक स्तरावर देण्यात आली होती. यासाठी सारंग कुलकर्णी यांच्या माध्यमातून कन्सल्टंट सर्वे कंपनीचीही नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती नाईक यांनी दिली आहे. नौदला दिन ज्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती साजरा झाला यावेळी अवघ्या जगाने जिल्ह्याचा किनारा पहिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पर्यटन दृष्ट्या जागतिक नकाशावरती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव जात असताना हा प्रकल्प मात्र आता पद्धतशीरपणे गुजरातला नेण्याचा गुजरात शासन व केंद्र शासनाचा डाव आहे. आता तो डाव यावरून दिसून आल्याचा आरोप हे नाईक यांनी केला आहे. जिल्ह्यातील तीन मंत्री आहेत दोन मंत्री राज्य सरकारमध्ये आहेत तर एक मंत्री केंद्र सरकारमध्ये आहे. असे असताना हा प्रकल्प गुजरातमध्ये नेणं म्हणजे महाराष्ट्राजवळ गद्दारी आहे.

आज जे सरकार, लोकप्रतिनिधी आहेत ते मोदी आणि शहांच्या ताटाखालची मांजर आहेत, हे मात्र या निमित्ताने पुन्हा एकदा निश्चित झाले असल्याची टीका नाईक यांनी केली आहे. तर हा प्रकल्प इथेच झाला पाहिजे यासाठी शिवसेनेकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून टीका झाल्यानंतर आता जिल्ह्यातील मंत्री व शासनाकडून या प्रकल्पासंबंधी कोणते भाष्य केले जाते, कोणती भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(Edited by Amol Sutar)

Vaibhav Naik
Ashok Chavan News : जागा वाटप का होत नाही? अशोक चव्हाणांनी सांगितलं खरं कारण...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com