Mumbai News : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यात महायुतीचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले असून त्यासाठी महायुतीमधील घटक पक्ष जोरदार तयारी करीत आहेत.
राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला संध्याकाळी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. त्यातच या मैदानाच्या पाहणीसाठी भाजपचे नेते गेल्याने शिंदे गटाच्या नेत्याने नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी येत्या पाच डिसेंबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. भाजप (Bjp) हा विधानसभा निवडणूक निकालात सर्वात मोठा पक्ष ठरल्याने आता मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र, अजूनही गृहमंत्रिपदाचा पेच कायम आहे. एकीकडे एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे भाजपला देखील गृहमंत्रिपद हवे आहे, अशी माहिती समोर येत आहे.
त्यातच आता शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. कशा रीतीने मान राखायचा हे दिल्लीने ठरवायचे आहे. आम्ही ठरवणार नाहीत, असे सूचक वक्तव्य माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.
एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. प्रकिया लेट होतेय त्यात त्यांची काही भूमिका आहे. भाजपची निवड प्रकिया कधी व्हावी, हा भाजपचा विषय आहे. तरी सोमवारची बैठक रद्द ह्या बातम्या येत आहेत. कोणतीही बैठक नव्हती. त्यांची तब्येत ठीक नाही. भाजपकडून जो काही निर्णय होईल, तो मान्य असेल हे त्यांनी आधीच सांगितले आहे.
आमच्याकडून कोणताही उशीर झालेला नाही. ज्या वेळी बैठक ठरेल तेव्हा ते इकडेही बसतील आणि दिल्लीलाही जातील. तीन पक्षाचे सरकार असतं तेव्हा चर्चा होतं असते. पण त्यामुळे नाराज आहेत वगैरे बोलणे चुकीचे आहे. आमची एकच मागणी आहे की एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. त्यांचा योग्य तो सन्मान राखला गेला पाहिजे. ह्या विजयाला फार मोठे महत्व असल्याचे त्यांनी स्प्ष्ट केले.
मी फडणवीसांना मेसेज केला आहे. महायुतीची सत्ता येत आहे. पण मैदानाची पाहाणी करायला एकच पक्ष जात आहे. त्यामुळे लोकांमध्ये चुकीचा मेसेज जातो. कळवळ असती तर आम्हीही आलो असतो. याबाबत मी देवेंद्रजींना भेटायला जाणार होतो. मात्र ते आराम करत असल्याने भेट होऊ शकली नाही. पण जनतेने गैरसमज करु नये. आम्ही एकत्र आहोत. भाजपचे अध्यक्ष एकटे पाहणी करायला गेले, असल्याचे केसरकर यावेळी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.