BJP Legislature Leader : भाजपचे निरीक्षक ठरले; विजय रुपाणी, निर्मला सीतारामन करणार विधिमंडळ गटनेत्याची निवड

BJP Legislative Group Leader Selection by Vijay Rupani and Nirmala Sitharaman : भाजप हायकमांडने पक्ष निरीक्षक म्हणून ज्येष्ठ नेते विजय रूपाणी, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांची नियुक्ती केली आहे. भाजपचे निरीक्षक मंगळवारी रात्री मुंबईत येणार असल्याची माहिती सूत्राने दिली.
Bjp Flags
BJP FlagsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्यासाठी उद्या रात्री भाजपचे निरीक्षक मुंबईत येणार आहेत. भाजप हायकमांडने पक्ष निरीक्षक म्हणून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांची नियुक्ती केली आहे. भाजपचे निरीक्षक मंगळवारी रात्री मुंबईत येणार असल्याची माहिती सूत्राने दिली. त्यांच्या उपस्थित राज्यातील भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्यात येणार आहे.

राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यात महायुतीचे सरकार येणार हे जवळपास निश्चित आहे. त्यासाठी महायुतीमधील घटक पक्ष जोरदार तयारी करीत आहेत. मंत्रिमंडळातील खातेवाटपावरून चुरस पहावयास मिळत असतानाच सर्वांचे भाजपचा (BJP) गट नेता निवडीकडे लक्ष लागले होते.

भाजपच्या विधीमंडळ नेत्याची नेमणूक करण्यासाठी हायकमांडने पक्ष निरीक्षक म्हणून विजय रुपाणी, निर्मला सीतारमण यांची नेमणूक केली आहे. या निरीक्षकाच्या उपस्थित मंगळवारी राज्यातील नवनिर्वाचित आमदारांची बैठक होणार आहे. त्यामध्ये विधीमंडळ नेते, प्रतोद, गटनेत्याची निवड केली जाणार आहे.

Bjp Flags
Maharashtra Assembly Election : ऐतिहासिकः पाच वर्षे अन् निकालही...

महायुती सरकारच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा येत्या पाच तारखेला पंतपप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील घडामोडीना वेग आला आहे. दोन दिवसापूर्वी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे येथे त्यांच्या गावी गेले होते. त्यामुळे महायुतीच्या बैठका थंडावल्या होत्या. मात्र, शिंदे हे रविवारी मुंबईत दाखल झाले आहेत, त्यामुळे सत्तास्थापनेच्या घडामोडीना आता वेग येणार आहे.

Bjp Flags
Shrikant Shinde : उपमुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवर श्रीकांत शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले, मतदारसंघ आणि शिवसेनेसाठीच..!

दरम्यान, सोमवारी दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी दिल्लीला निघाले आहेत. ते सोमवारी दुपारी दिल्लीला रवाना होणार आहेत. यावेळी ते भाजपच्या हायकमांड सोबत चर्चा करणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रीपदाबाबत चर्चा होणार असल्याचे समजते.

सोमवारी महायुतीमधील मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या नेतेमंडळीने सागर बंगल्यावर एकच गर्दी केली होती. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची ही आमदार मंडळी भेट घेऊन मंत्रीपदासाठी लॉबिंग करताना दिसत आहेत. त्यामुळे इच्छुक मंडळींनी मोठी गर्दी केली आहे.

Bjp Flags
Ajit Pawar Politic's : अजितदादांचा ठाकरे, शरद पवारांना दे धक्का...तीन माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर!

दरम्यान, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त निश्चित झाला आहे. 5 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडणार असून यावेळी अनेक राज्यातील मुख्यमंत्री सुद्धा या सोहळ्याला उपस्थितीत राहणार आहेत. यावेळी मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी उपस्थितीत राहणार आहेत. आझाद मैदानावर होत असलेल्या या शपथविधी सोहळ्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे.

Bjp Flags
Shivsena News : एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराकडून केंद्रीय मंत्र्यावर आरोप; निवडणुकीत काम न केल्याचा ठपका

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com