Delimitation India News Sarkarnama
महाराष्ट्र

Lok Sabha Delimitation: केंद्रात हालचालींना वेग! लोकसभा-विधानसभेच्या जागा वाढणार; महाराष्ट्रात किती आमदार-खासदार?

Delimitation India News: लोकसभेच्या जागा 543 वरून थेट 816 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. यात महिला खासदारांची संख्या 273 वर पोहोचणार आहे. यासाठी 2011 ची जनगणना महत्वपूर्ण ठरणार आहे.

Mangesh Mahale

केंद्र सरकार देशाचा राजकीय नकाशा बदलण्याच्या तयारीत आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत (डिलिमिटेशन) केंद्र सरकारने 'मिशन २०२९'अंतर्गत राजकीय घडामोडींचा वेग वाढला आहे. या निर्णयामुळे देशाच्या राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलणार आहे.

गेल्या अनेक दिवसापासून लोकसभा खासदारांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता, त्यावर अनेक वेळा चर्चा झाली पण ठोस पाऊल उचलेले गेले नाही. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विविध राजकीय पक्षाच्या वरिष्ठांशी भेटी-गाठी घेतल्या.

लोकशाहीच्या या ऐतिहासिक बदलासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी संसद भवनात एनडीएच्या घटकपक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (UBT), BJD आणि MIM सारख्या प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी नुकतीच चर्चा केली.

अमित शाह लवकरच काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला तरगरज पडल्यास संसदेचे अधिवेशन वाढवून किंवा विशेष अधिवेशन बोलावून याबाबतची घटना दुरुस्ती करण्याचा मानस केंद्र सरकारचा आहे.

यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. त्यासाठी सत्ताधारी एनडीएकडे आवश्यक संख्याबळ नाही, त्यामुळे मतदारसंघ पुनर्रचनेसाठी सरकारकडून सर्वपक्षीय सहमती तयार करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

लोकसभेच्या जागा 543 वरून थेट 816 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. यात महिला खासदारांची संख्या 273 वर पोहोचणार आहे. यासाठी 2011 ची जनगणना महत्वपूर्ण ठरणार आहे.

लोकसभेत ८१६ खासदार आणि महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण....

'लॉटरी सिस्टीम'द्वारे दर तिसरी जागा महिलांसाठी राखीव ठेवून महिला आरक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा सरकारचा विचार आहे. यामुळे विद्यमान पुरुष खासदारांना धक्का न लावता महिलांचे प्रतिनिधित्व वाढवता येणार आहे. महिला आरक्षण ३३ टक्के करण्यात येणार असा प्रस्ताव आहे.

'नारी शक्ती वंदन सुधारित अधिनियम' विधेयक केंद्र सरकारकडून संसदेच्या सभागृहाच आणण्याची जोरदार तयारी सुरू आहे. अमित शाह यांनी सोमवारी एनडीए आणि विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत (BJD, YSRCP, NCP-SP, शिवसेना-UBT, AIMIM) महत्त्वाची चर्चा केली. या प्रस्तावामुळे देशाच्या राजकारणात मोठे फेरबदल होणार आहेत.

काय आहे प्रस्ताव

एकूण लोकसभा जागा- 543 वरून 816 पर्यंत वाढण्याची शक्यता

महिला खासदारांची संख्या (33%) जी 82 (अंदाजे) 273 होण्याची शक्यता

महाराष्ट्रातील जागा 48 वरून 72 होण्याची शक्यता

महाराष्ट्रात किती आमदार वाढणार

महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत हालचाली सुरु आहे. विधानसभा जागा- 288 वरुन ४३२ पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेसाठी २०११ ची जनगणना आधार मानून राज्यांमधील जागांचे सध्याचे गुणोत्तर (Ratio) कायम राखले जाणार आहे. . लोकसभेत बहुमताचा आकडा २७२ वरून थेट ४०९ वर पोहोचणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT