Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

NCP SP Candidates List: शरद पवारांच्या पक्षाची चौथी यादी जाहीर; सलील देशमुख, रमेश थोरातांसह सात नावे

NCP Sharad Pawar 4th Candidates List: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने चौथ्या यादीत सात मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत.

Rajanand More

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची चौथी यादी सोमवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये सात मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून काटोल मतदारसंघातील उमेदवार बदलण्यात आला आहे. यापूर्वी काटोल मतदारसंघातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तिकीट जाहीर झाले होते.

काटोलमध्ये अनिल देशमुखांचे पुत्र सलील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे यादी जाहीर होण्यापूर्वीच सलील देशमुख आज उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. पण कार्यालयात पोहचण्यास विलंब झाल्याने त्यांना अर्ज दाखल करता आला नाही. त्यांच्यासोबत अनिल देशमुखही उपस्थित होते.

दौंडमधून रमेश थोरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर थोरात हे अजित पवारांसोबत गेले होते. आता निवडणुकीच्या तोंडावर आपली मोठी चूक झाल्याचे सांगत थोरातांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे नुकतेच जाहीर केले होते. त्यामुळे त्यांना दौंडमधून महायुतीचे उमेदवार राहुल यांच्याविरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता होता. त्यावर सोमवारी शिक्कामोर्तब झाले आहे.

हे आहेत राष्ट्रवादीचे सात शिलेदार

काटोल – सलील देशमुख

माण – प्रभागर घार्गे

खानापूर – वैभव पाटील

दौंड – रमेश थोरात

पुसद – शरद मैंद

सिंदखेडा - संदीप बेडसे

वाई – अरुणादेवी पिसाळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT