Raj Thackeray, Sada Sarvankar Sarkarnama
महाराष्ट्र

Raj Thackeray : 'अमितच्या विरोधात उभं राहणाऱ्यांची अंडीपिल्ली काढू शकतो पण...' राज ठाकरे गरजले

Raj Thackeray Criticized sada sarvankar Mahesh Sawant : लोकसभेला बिनशर्त पाठींबा देत असताना अमित उभा राहणारे हे माझ्या मनात देखील आलं नव्हतं. त्यामुळे तो विषयच नव्हता. मी फक्त येवढ्यच सांगितलं तुम्हाला काय करायचे ते करा, असे राज ठाकरे म्हणाले.

Roshan More

Raj Thackeray News : माहिम मतदारसंघात अमित ठाकरे मनसेचे उमेदवार आहेत. अमित ठाकरेंसाठी राज ठाकरेंनी प्रभादेवीमध्ये जाहीर सभा घेतली. यासभेत अमित यांच्या विरोधात उभे असलेले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांच्यावर नाव न घेता राज ठाकरेंनी जोरदार हल्ला चढवला.

'अमितच्या विरोधात जी लोकं उभी आहेत त्यांची सगळी अंडीपिल्ली काढू शकतो पण त्या घाणीत मला हात नाही घालायचा. जो कोणाचा झाली नाही त्याच्या बद्दल आपण काय बोलायचं. बाळासाहेब हयात असताना ती व्यक्ती काँग्रेसमध्ये गेली. आमदारकीला उभी राहिली. तिथं पडली मग परत शिवसेनेत आली. शिवसेनेत निवडणूक लढून जिंकून आली. मग एकनाथ शिंदेंचे बंड झालं तेव्हा त्यांना पेट्रोलपंपावर शिव्या दिल्या आणि संध्याकाळी परत एकनाथ शिंदेंसोबत जाऊन बसले.', असे टोला सदा सरवणकर यांचे नाव न घेता राज ठाकरेंनी लगावला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांचे देखील नाव न घेता राज ठाकरेंनी टीका केली. राज म्हणाले, ती दुसरी व्यक्ती ही यांच्यासोबत उभी आहे. ती देखील बाळासाहेब आहात असताना काँग्रेसमध्ये गेली. त्यांच्याकडून नगरसेवकपदासाठी निवडणूक लढली.

लोकसभेला बिनशर्त पाठींबा देत असताना अमित उभा राहणारे हे माझ्या मनात देखील आलं नव्हतं. त्यामुळे तो विषयच नव्हता. मी फक्त येवढ्यच सांगितलं तुम्हाला काय करायचे ते करा.अमितला निवडून नक्की आणणार.अमितसाठी माझी ही एकच सभा आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

मी ठरवलं होत कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. त्यामुळे 2006 ला शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर स्वतःचा पक्ष काढला. माझी महाराष्ट्रासाठी अनेक स्वप्न आहेत. मला महाराष्ट्र वेगळा घडवायचा आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT