Mumbai News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीने बहुमत मिळाले. भाजप महायुतीला 237 जागा मिळाल्यात. महायुती देखील एवढ्या मोठ्या यशाने भारावून गेली आहे. त्यामुळे कोणत्या समाजाने कोणच्या पारड्यात किती मते टाकली, याची आकडेवारी मांडली जात आहे.
यात मुस्लिम समाजाने लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केल्याचे सांगितले जाते, आकडेवारी मांडली जात आहे. आता विधानसभा निवडणुकीला मुस्लिम समाजाचे मतदान नेमके कोणच्या बाजूने याची आकडेवारी समोर आली आहे.
राज्यातील 38 विधानसभा मतदारसंघात मुस्लिम लोकसंख्या 20 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या मतदारसंघापैकी 22 ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झालेत. महाविकास आघाडीला (MVA) अवघ्या 13 जागांवर विजय मिळाला आहे. तर अन्य तीन जागांवर इतर उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
मुस्लिम मतदारांची मते यंदाच्या निवडणुकीत फाटाफूट झाल्याचे दिसते. गेल्या विधानसभा निवडणुकीत 11 जागा काँग्रेस जिंकला होता. यावेळी पाचच जागांवर काँग्रेसला समाधान मानावे लागले. शिवसेना (Shvisena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सहा, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत.
राज्यात सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या आहेत. मुस्लिम लोकसंख्या जास्त असलेल्या 38 मतदारसंघात भाजपने आपली कामगिरीत चांगलीच सुधारणआ केली आहे. गेल्या निवडणुकीत 11 जागा जिंकणाऱ्या भाजपने यंदा 14 जागा जिंकल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने सहा, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागा जिंकल्या आहेत. समाजवादी पक्षाने दोन, तर एमआयएमने एक जागा जिंकली आहे. झिशान सिद्दिकी, नवाब मलिक आणि नसीम खान हे दिग्गज मुस्लिम नेते या निवडणुकीत पराभूत झाले आहेत.
एकापेक्षा जास्त मुस्लिम उमेदवार असल्याचा फटका महाविकास आघाडीला बसला आहे. यातून महायुतीचा विजय सोपा झाला. छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा पराभव मतविभागणीमुळे झाला. वंचितचे अफसर खान आणि समाजवादी पक्षाचे अब्दुल गफार सय्यद या मुस्लिम उमेदवारांनी इम्तियाज जलील यांच्या पराभवात निर्णायक भूमिका बजावली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.