Mumbai News : राज्यात कुठल्याही प्रकारची इंधनटंचाई नाही. मात्र, काही ठिकाणी पेट्रोल-डिझेलची कमतरता नसतानही नागरिकांनी पेट्रोल पंपांवर रांगा लावल्या आहेत. त्यामुळे इंधनटंचाई असल्यासारखे जाणवत आहे. मात्र राज्यात कुठेच पेट्रोल किंवा डिझेलचा काळाबाजार होत नाही. मात्र, पेट्रोल-डिझेलसंदर्भात गेल्या काही दिवसापासून अफवा पसरवल्या आजच्या आहेत. त्या अफवा पसरवणाऱ्याना मंत्री गिरीश महाजन यांनी थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
पेट्रोलसाठी काही ठिकाणी रांगा लागत आहेत, यासंदर्भातही गिरीश महाजन यांनी भाष्य केले. गेल्या महिन्यापेक्षा दीड पट मागणी गेल्या चार महिन्यात वाढली आहे. कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे, पेट्रोल पंप चालकांकडे संपूर्ण पेट्रोल-डिझेलचा साठा आहे. मात्र, मागणी अधिक वाढल्याने तुटवडा जाणवत आहे. अतिरिक्त साठा करण्याची गरज नाही, सोशल मीडियावर अफवा पसरत आहेत. त्यामुळे, रांगा लागत आहेत. राज्यात कुठेही तुटवडा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर एजन्सीबाहेर रांगाच रांगा लागल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नसून ग्राहकांना नियमितपणे मिळेल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. आता, पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याचे पाहायला मिळत आहे. पेट्रोल पंपावर नागरिकांच्या रांगा लागल्या असून आपल्या वाहनात पेट्रोल टाकण्यासाठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. पेट्रोल-डिझेलसंदर्भात अफवा पसरवल्यास गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराच मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिला.
कमर्शियल गॅस बाबतीत तुटवडा आहे, घरगुती बाबतीत नाही. 350 के1 रॉकेल आलं असून त्याचा वापर करुन आपली गरज भागवू शकतो, असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. तसेच, सोशल मीडियावर पेट्रोल-डिझेल तुटवड्यासंदर्भात जे अफवा पसरवीत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार, असा इशारा देखील गिरीश महाजन यांनी दिला आहे. गिरीश महाजन यांनी विविध विषयांवर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे दिली.
अशोक खरात प्रकरण अतिशय गंभीर असून ही विकृती आहे, आपल्या समाजात काही लोक या गोष्टी माननारे आहेत, ते विश्वास ठेवतात. मला दोन महिन्यांपूर्वी याबाबत कल्पना होती, पोलिसांना तशी सूचना दिली होती. आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार गंभीर दखल घेतली जाईल. अशोक खरातची हजारो कोटींची प्रॉपर्टी आहे, त्याच्या प्रॉपर्टीज कशा जोडल्या जातील याबाबत देखील कारवाई होईल, असे महाजन म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.